वंचित बहुजन आघाडीचा प्रतिसाद पाहून नांदेडमध्ये भाजप-काँग्रेसला धडकी?

नांदेड : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड लोकसभेची निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस स्वतः नांदेडकडे विशेष लक्ष ठेवून आहेत. त्यांनी आतापर्यंत नांदेडमध्ये चार-पाच वेळा येऊन या निवडणुकीत रंगत आणली. काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नांदेडमध्ये मैदानात आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे खंदे समर्थक प्रताप पाटील भाजपाचे उमेदवार आहेत. त्यामुळे ही निवडणूक अप्रत्यक्षपणे …

वंचित बहुजन आघाडीचा प्रतिसाद पाहून नांदेडमध्ये भाजप-काँग्रेसला धडकी?

नांदेड : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड लोकसभेची निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस स्वतः नांदेडकडे विशेष लक्ष ठेवून आहेत. त्यांनी आतापर्यंत नांदेडमध्ये चार-पाच वेळा येऊन या निवडणुकीत रंगत आणली. काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नांदेडमध्ये मैदानात आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे खंदे समर्थक प्रताप पाटील भाजपाचे उमेदवार आहेत. त्यामुळे ही निवडणूक अप्रत्यक्षपणे आजी माजी मुख्यमंत्र्यांमध्येच होत असल्याचं दिसतंय. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीला मिळणारा प्रतिसाद पाहता काँग्रेस-भाजपच्या उरात धडकी भरली आहे.

नांदेड हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून राज्यात प्रसिद्ध होता. 2014 च्या मोदी लाटेतही काँग्रेसचे अशोक चव्हाण इथून भरघोस मताने निवडून गेले. तेव्हापासून नांदेड हे भाजपचं टार्गेट बनलंय. इथली लोकसभेची जागा जिंकण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी जातीने लक्ष घातलं. फडवणीस यांनी आपले समर्थक प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी देत निवडणूक रिंगणात उतरवलं. चिखलीकर हे नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या बाहेरचे आहेत. तरीही एक जनाधार असलेला नेता म्हणून चिखलीकर यांनाच उमेदवारी देण्यात आली. सुरुवातीला लोकसभा लढवण्यासाठी अनुत्सुक असलेले चव्हाण ऐनवेळी मैदानात आले. एकेकाळचे सहकारी मित्र राहिलेले अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर एकमेकांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरले. त्यामुळे काँग्रेससाठी नेहमी एकतरफी होणारी नांदेडची निवडणूक रंगतदार बनली.

सुरुवातीला प्रभावहीन वाटलेल्या वंचित बहुजन आघाडीला नांदेडमध्ये निवडणूक ज्वरात प्रचंड प्रतिसाद मिळाला. वंचित आघाडीच्या सभांना लोकांनी नुसती गर्दीच केली नाही, तर आघाडीला आर्थिक मदतही केली. भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यावरील विश्वास दिवसेंदिवस वाढत गेल्याचं चित्र नांदेडमध्ये पाहायला मिळतंय. नांदेड हा नेहमी चळवळीत अग्रेसर राहणारा जिल्हा आहे. त्यामुळे वंचित घराघरात पोहोचली. वंचित आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे असले तरी प्रकाश आंबेडकरच निवडणूक मैदानात आहेत, असं समजून प्रत्येक जण निवडणूक प्रचार करतोय. वंचित आघाडीला मिळणारा प्रतिसाद पाहून काँग्रेस आणि भाजप दोघांनाही घाम फुटलाय.

नांदेडमध्ये सपा-बसपाने युती करत अब्दुल समदला निवडणूक मैदानात उतरवलं. अल्पसंख्यांक समाजात लोकप्रिय असलेले समद किती मतदान घेतात त्यावर नांदेडचं भविष्य अवलंबून आहे. गेल्या अनेक वर्षानंतर यावेळी नांदेडमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदार गंभीर झालेले दिसत आहेत. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यातच दर 15 वर्षांनी नांदेडमध्ये लोकसभेचा धक्कादायक निकाल लागण्याची परंपरा आहे. ही परंपरा यावेळी ही कायम राहते का याकडे जिल्ह्याचं लक्ष लागलंय.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *