Tukaram Mundhe : ॲनालॉग पनीर बॅन, आता चायनीज फुड टार्गेटवर, तुकाराम मुंढेंनी सांगितलं पुढचं लक्ष्य!
त्यावेळी फरसाण आणि केळी खायचो. तेव्हा तो प्रकार फेमस होता. आता मी खाल्लं तर दोन तासात मी बोलू शकणार नाही. आता विचार करतो. तेव्हाचं तेल कसं असेल. त्यावेळी स्ट्रीट फूड आवडायचं, अशी आठवण तुकाराम मुंढे यांनी सांगितली.

Tukaram Munde : तुकाराम मुंढे हे राज्यातील धडाडीचे आयएएस अधिकारी मानले जाते. ते सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त आहेत. या विभागाचे आयुक्तपद स्वीकारल्यानंतर त्यांनी भेसळयुक्त खाद्यपदार्थांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. दूधात भेसळ, भेसळयुक्त पनीर तसेच निकृष्ट दर्जाचे जेवण देणाऱ्या रेस्टॉरंट्स आणि हॉटलेवर त्यांनी कठोर कारवाई केली आहे. दरम्यान, आता तुकाराम मुंढे यांनी आपली नवी मोहीम जाहीर केली आहे. आता मुंढे यांच्या टार्गेटवर चायनीज फूड असणार आहे.
आता चायनीज फूडवर कारवाई करा म्हणतात
‘पुणे लोकल’ आणि ‘माय जनसेवक’ यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित ‘भविष्यवेध – संवाद भविष्याचा’ या उपक्रमांतर्गत ‘अनस्टॉपेबल तुकाराम’ या विशेष मुलाखत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना मी कॉलेजला असताना पुणे विद्यापीठात चायनीज गाड्या असायच्या. पाषाण रोडला. मी विचार केला. तिथे जाऊन पाहावं का? माझं पहिलं चायनीज फूड मी तिथे खाल्लं. पण तोपर्यंत मला चायनीज फूड माहीत नव्हतं. आता भरपूर चायनीज फुडला डिमांड आहे. मी काही कारवाया केल्या. लोक म्हणतात आता चायनीज फूडवर कारवाई करा म्हणतात. आता पुढं लक्ष द्यायचं आहे, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.
संभाजी नगरला रस्त्यावर ऑम्लेट पावच्या गाड्या…
सोबतच तुकाराम मुंढे यांनी त्यांचा आवडता खाद्यपदार्थही सांगितला आहे. “आवडतं फूड असं म्हणणार नाही. आवडतं होतं. बऱ्याचदा कंडिशनमध्ये काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात. मी कॉलेजला असताना प्रॉपर जेवण मिळत नव्हतं. मेस लावू शकत नव्हतो. तेव्हा अशी व्यवस्था केली होती. संभाजी नगरला रस्त्यावर ऑम्लेट पावच्या गाड्या असतात. अप्सरा, आंबा टॉकीजच्या समोर ऑम्लेटच्या गाड्या लागायच्या. मला ऑम्लेट माहीत नसायचं. तिथे पहिल्यांदा खाल्लं. भावाने गाडीवाल्याला सांगितलं हा जेव्हा येईल तेव्हा ऑम्लेट द्या. मी पैसे देईन. त्यामुळे ऑम्लेट खायची चटक लागली,” अशी आठवण तुकाराम मुंढे यांनी सांगितली.
फरसाण आणि केळी खायचो
तसेच, त्यावेळी फरसाण आणि केळी खायचो. तेव्हा तो प्रकार फेमस होता. आता मी खाल्लं तर दोन तासात मी बोलू शकणार नाही. आता विचार करतो. तेव्हाचं तेल कसं असेल. त्यावेळी स्ट्रीट फूड आवडायचं. आता कोणतं आवडत नाही. विशेष म्हणजे दोन महिन्यापासून मी खात नाही, असही त्यांनी पुढे सांगितलं.