Udayanraje: राजेशाही असती तर याकूब मेमनच्या कबरीचा बंदोबस्त केला असता, अफजलखानाची कबर… हे् काय म्हणाले खासदार उदयनराजे भोसले?

| Updated on: Sep 08, 2022 | 4:08 PM

या वादावर प्रतिक्रिया देताना उदयनराजे म्हणाले आहेत की, तुम्ही लोकांनी मागणी केली राजेशाही नको लोकशाही हवी. त्यामुळे आज याकूब मेननच्या कबरीवर असे प्रकार होत आहेत, राजेशाही आसती तर कधीच त्या कबरीचा बंदोबस्त आम्ही केला आसता. अशी तीव्र प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

Udayanraje: राजेशाही असती तर याकूब मेमनच्या कबरीचा बंदोबस्त केला असता, अफजलखानाची कबर... हे् काय म्हणाले खासदार उदयनराजे भोसले?
उदयनराजे भोसले
Image Credit source: social media
Follow us on

सातारा- 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी आणि फाशी देण्यात आलेल्या याकूब मेमनच्या (Yakub Memon)कबरीच्या कथित सजावटीवरुन राजकीय वातावरण तापलेले आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)सरकारच्या काळात मुंबईच्या या गुन्हेगाराची कबर फुलांनी आणि लायटिंगने सजवण्यात आल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात या कबरीचे मजारमध्ये रुपांतर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर दिवसभर राजकीय आरोप प्रत्यारोपांना तोंड फुटलेलं आहे. तर बडा क्रबस्थानने हे आरोप फेटाळून लावले आहेत. व्हायरल होत असलेले फोटो खोटे असल्याचा दावा करण्यात येतो आहे. एकनाथ शिंदे सरकारकडून या प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. याबाबत छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले (Udayan Raje)यांनीही या वादात उडी घेतली आहे. राजेशाही असती तर असे प्रकार घडले नसे असे त्यांनी सांगतिले आहे.

लोकांनाच लोकशाही हवी आहे- उदयनराजे

या वादावर प्रतिक्रिया देताना उदयनराजे म्हणाले आहेत की, तुम्ही लोकांनी मागणी केली राजेशाही नको लोकशाही हवी. त्यामुळे आज याकूब मेमनच्या कबरीवर असे प्रकार होत आहेत, राजेशाही आसती तर कधीच त्या कबरीचा बंदोबस्त आम्ही केला आसता. अशी तीव्र प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. एकनाथ शिंदे सरकारने या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले ते चांगले आहे, असेही उदयनराजे म्हणाले आहेत. मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटात लाखो लोक मेमन याने मारले. त्याच्या कबरीबाबत मागच्या मविआ सरकारनेच हे आदेश द्यायला हवे होते, असेही उदयनराजे म्हणाले आहेत.

अफजलखानच्या कबरीवरही उदयनराजेंचे वक्तव्य

किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली आफजलखानाची कबर खुली करायला हवी, असेही मत यावेळी उदयनराजे यांनी व्यक्त केले आहे. त्याशिवाय लोकांना छत्रपती शिवाजी महारांजाचा इतिहास कसा कळेल, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे ती कबर खुली करायला हवी, असे आपले वैयक्तिक मत असल्याचे उदयनराजे यांनी म्हटले आहे. राज्यात लोकशाहीची मुहर्तमेढ छत्रपती शिवाजी महारांजानी रोवली आहे, असेही ते म्हणाले. आफजलखानाचा वध कसा झाला, ते लोकांना माहिती व्हावे, यासाठी
ती कबर खुली करावी असे प्रामाणिक मत आहे, असे उदयनराजे म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

मेमन याच्या कबरीवरुन शिवसेना-भाजपा आमनेसामने

या कबरीच्या फोटोवरुन भाजपाने शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले आहे. शिवसेना सत्ते असताना दाऊदच्या समर्थनाची भूमिका घेत होती, आता ती दाऊदच्या प्रचारकाच्या भूमिकेत आहे, अशी जळजळीत टीका मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे. पेंग्विन सेनेने आता कबर बचाव कार्यक्रम जाहीर करावा अशी टीकाही शेलार यांनी केली आहे. तर याला शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. निवडणुकांच्या तोंडावर हे राजकारण करण्यात येत असल्याची टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. याकूब मेमन याचे दफन मान सन्मानात का झाले, तेव्हा कुणाचे सरकार होते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबेळी ओसामा बिन लादेनप्रमाणे मेनन याच्याबाबतीत का करण्यात आले नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.