साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर IIT मुंबईची पहिली प्रतिक्रिया, प्रोफेसर सूर्यनारायण डुल्लांवरही कारवाई

साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर IIT मुंबईची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. संस्थेने माफी मागितली असून प्रोफेसर सूर्यनारायण डुल्ला यांच्यावरही निलंबनाची कारवाई केली आहे.

साहिल वाकोडेच्या मृत्यूनंतर IIT मुंबईची पहिली प्रतिक्रिया, प्रोफेसर सूर्यनारायण डुल्लांवरही कारवाई
sahil wakode
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 21, 2026 | 3:05 PM

आयआयटी मुंबईतील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणाचे पडसाद महाराष्ट्रभर उमटू लागले आहेत. राजकीय संघटनांकडून त्याची संस्थात्मक हत्या झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेने राज्यभरात संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे. तसेच आयआयटी मुंबईचा कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे. तर आज विविध संघटनातर्फे आयआयटी प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात येत आहे. आता या प्रकरणात आयआटी मुंबईची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणावरून संस्थेने माफी मागितली आहे.

साहिल वाकोडे मृत्यू प्रकरणावरून आधी केलेल्या वक्तव्यावरून आयआयटी मुंबई संस्थेने माफी मागितली आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून संपूर्ण तपास होत नाही, तोपर्यंत या प्रकरणावर भाष्य करणे अयोग्य मानले जाते. संस्थेने विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्या मान्य केल्या आहेत. संस्थेने या प्रकरणातील संबंधित प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

आयआयटी मुंबईतील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी साहिल रवींद्र वाकोडे या विद्यार्थ्याचा हॉस्टेलमध्ये मृतदेह सापडला. तो मूळचा यवतमाळचा रहिवासी होता. त्याने टोकाचा निर्णय घेण्याआधी संस्थेने छळ केल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. त्याला जातीय भेदभावाला सामोरे जावे लागत होते, असाही आरोप केला. साहिलच्या पालकांच्या तक्रारीवरून पवई पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी दिली.

राजेंद्र पातोडे या प्रकरणावर म्हणाले, ‘आयआयटी मुंबईसारख्या देशातील अग्रगण्य संस्थेत दलित-बहुजन विद्यार्थ्यांवर होणारे जातीय अत्याचार शृंखला आहेत. अनिकेत अंभोरे, दर्शन सोलंकी आणि आता साहिल वाकोडे ह्याचा संस्थात्मक खून करण्यात आलाय. ही मालिका संस्थेतील जातीय भेदभाव आहे. या सर्व प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून जातीय छळाला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. संस्थेतील डीन आणि संचालकांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us