अर्भक लपवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये चेंबर, औरंगाबादमधील खळबळजनक प्रकार

अर्भक लपवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये चेंबर, औरंगाबादमधील खळबळजनक प्रकार

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपाताचं रॅकेट समोर आलं आहे. विमल माता बाल हॉस्पिटलमध्ये अवैधरित्या गर्भपात केलेल्या मुलींच्या अवयवांना लपवण्यासाठी चेंबर आणि गटार आढळले. त्यामुळे औरंगाबादसह संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे.

औरंगाबादमधील अवैध गर्भलिंग निदान आणि गर्भपात रॅकेटप्रकरणी आतापर्यंत 9 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. यातील आरोपी वर्षा राजपूत यांच्या रुग्णालयावर पोलिसांनी काल छापा टाकला होता. या छाप्यात पोलिसांना वर्षा राजपूत यांच्या विमल माता बाल रुग्णालयात गर्भपात केलेल्या मुलींच्या अवयव लपवण्यासाठी चक्क चेंबर आणि गटार आढळून आले. पोलिसांच्या छापेमारी करणाऱ्या पथकाने चेंबर आणि गटाराचे खोदकाम करुन तपास केला.

काही दिवसांपूर्वी गर्भलिंग निदान करणाऱ्या एक जणाला अटक करण्यात आली होती. त्याच्या चौकशी दरम्यान मिळालेल्या माहितीनंतर औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य विभागाने पोलिसांच्या मदतीने विमल माता बाल रुग्णालयात छापा टाकण्यात आला. त्यात हे रॅकेट उघडकीस आले.

Published On - 2:41 pm, Wed, 6 February 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI