IMD Weather Update : महाराष्ट्रावर आता नवं संकट, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, आयएमडीचा हादरवणारा अंदाज

कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पुढील सात दिवस राज्यात अतिवृष्टीची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

IMD Weather Update : महाराष्ट्रावर आता नवं संकट, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, आयएमडीचा हादरवणारा अंदाज
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 16, 2025 | 6:43 PM

हवामान विभागाकडून देशातील अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील सात दिवस देशभरात अतिवृष्टीचा अंदाज आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.

काय आहे हवामान विभागाचा अंदाज?

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार पुढील सात दिवस गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 20 ते 22 ऑगस्टदरम्यान बिहारमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 19, 21 आणि 22 ऑगस्ट रोजी झारखंडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाकडून पुढील पाच दिवस झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, छत्तीसगड, सिक्कीम, उत्तराखडं, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?

महाराष्ट्राला पावसानं झोडपून काढलं आहे, गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू असून, नदी नाल्याला पूर आला आहे. दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील चार ते पाच दिवस राज्यामध्ये अशीच परिस्थिती राहणार आहे, हवामान विभागाच्या या नव्या इशाऱ्यामुळे चिंता वाढली आहे. हवामान विभागाकडून महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे, तसेच पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर वाढू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान राज्यात शुक्रवारी रात्रीपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. आज राज्यातील अनेक जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार कोकणातील रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट आहे, तर मुंबई, पालघर, नवी मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

दुसरीकडे आज पश्चिम महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.