weather update : राज्यात पावसाचं रौद्र रूप, या जिल्ह्यांना IMD चा हाय अलर्ट, पुढील 24 तास घराबाहेर पडणं टाळा
महाराष्ट्रात पावसाचा जोर आता आणखी वाढणार आहे, पुढील 24 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यात आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रासह 19 राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसानं चांगलाच जोर पकडला आहे, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. याचदरम्यान आता भारतीय हवामान विभागाकडून पावसासदंर्भात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रासह तब्बल 19 राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या नव्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून, पावासासोबत वादळी वाऱ्याची देखील शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 60 किमीच्या आसपास राहू शकतो. त्यामुळे या काळात मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, तसेच शेतकऱ्यांनी देखील काळजी घ्यावं असं आवाहान भारतीय हवामान विभागाच्या वतीने करण्यात आलं आहे. पर्वतीय प्रदेशात काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना देखील घडू शकतात, असंही हवामान विभागाने म्हटलं आहे.
या राज्यांना पावसाचा इशारा
हवामान विभागाच्या अंदाजानुसार एक ऑगस्ट शनिवारी उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, हरियाणा, राजस्थान, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या 19 राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तसेच या काळात मोठा वातावरणीय बदल पहायला मिळणार असून, तापमान 4 – ते 6 डिग्री अंश सेल्सिअसरने कमी होण्याची शक्यता आहे, असंही हवामान विभागाने म्हटलं आहे.
महाराष्ट्राला मोठा इशारा
महाराष्ट्रात पुढील 24 तास अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून घाटमाथ्यावर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुण्यात आज देखील मुसळधार पाऊस सुरू आहे, उद्या पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. परंतु रविवारनंतर मात्र पावसाचा जोर हळुहळु कमी होऊ शकतो, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. तर दुसरीकडे रत्नागिरी, रायगड, पालघर आणि सातारा जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, नाशिक जिल्ह्यात देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. इतरही काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.