पालकमंत्र्यांना कवडीची किंमत देत नाही, निदा खानविषयी विचारताच जलील भडकले; म्हणाले, पोलीस जे काही…

नाशिक आयटी कंपनी प्रकरणातील निदा खान हिला अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरातून तिला ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी मंत्री संजय शिरसाट यांनी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावरच जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पालकमंत्र्यांना कवडीची किंमत देत नाही, निदा खानविषयी विचारताच जलील भडकले; म्हणाले, पोलीस जे काही...
imtiaz jaleel and nida khan
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 08, 2026 | 3:04 PM

 Nida Khan Arrest : नाशिक आयटी कंपनी प्रकरणातील आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरातून अटक करण्यात आलं आहे. या अटकेनंतर छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत एमआयएमचे नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. निदा खान हिला लपवून ठेवण्यासाठी जलील यांनीच मदत केली, असं जलील यांनी म्हटलं असून त्याची एसआयटी चौकशी केली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. याच आरोपांवर आता इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

निदा खान उच्च न्यायालयात गेली असती तर…

निदा खान ही दहशतवादी असल्याचं चित्र निर्माण केलं जात आहे. तिच्यावर फक्त आरोप आहेत. ती दोषी ठरलेली नाही. संजय शिरसाट हे काही पोलीस आयुक्त नाहीयेत, असं इम्तियाज जलील म्हणाले आहेत. निदा खान उच्च न्यायालयात गेली असती तर तिला शंभर टक्के जामीन मिळाला असता. मी छोट्या-मोठ्या नेत्यांनी काय आरोप केले, त्यावर मी उत्तर देणार नाही, असा पलटावरही जलील यांनी केला.

तू जर चूक केली असशील तर…

मुलीने मला सगळी परिस्थिती सांगितली. मी एफआयआर वाचले. एफआयआरमध्ये तर काहीच नाही, असे आमच्या निदर्शनास आले. तू जर काही चूक केली असेल तर मी तुझ्यासोबत उभा राहणार नाही. परंतु तू जे सांगत आहेस ते खरे असेल तर मी तुझ्यासोबत पूर्ण ताकदीने उभे राहीन असे मी तिला सांगितले होते. कारण न्यायप्रणाली योग्य निर्णय देईल, असे जलील यांनी स्पष्ट केले.

निदा खानने मला मदत मागितली असती तर…

दुसरीकडे एआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल यांनी निदा खान यांना लपवून ठेवल्याचा आरोप आहे. याच आरोपाअंतर्गत पोलिसांनी मतीन पटेल यांना सहआरोपी केलं आहे. यावरही त्यांनी भाष्य केलं. निदा खानने जर मला मदत मागितली असती तर कदाचित मिही तिला मदत केली असती. कारण आरोपी आणि गुन्हेगार यात फरक असतो, असे जलील म्हणाले.

मी पालकमंत्र्यांना काडीमात्र किंमत देत नाही

पोलिसांनी एफआयआर दाखल केली असेल तर ते नियमाप्रमाणे कारवाई करतील. मी पोलिसांकडून या प्रकरणाची माहिती घेईल. मी माझ्या माणसांकडूनही सर्व माहिती घेईल. परंतु निदा खानला अटक झाली, तिला लपवून ठेवण्यात माझा हात आहे, असे समजणे चुकीचे आहे. मी पालकमंत्र्यांना काडीमात्र किंमत देत नाही. मला पोलीस जे काही विचारतील, त्यांच्या प्रश्नांना मी उत्तर देईल. मी पोलिसांना सहकार्य करेन, अशी भूमिका जलील यांनी स्पष्ट केली.

Follow Us