AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nida Khan: चक्रावून टाकणारा खुलासा…निदा खान तर वेगळीच निघाली! टीसीएस प्रकरणातील आरोपीचा खरा चेहरा पाहिला का?

Nida Khan First Image: नाशिकमधील टीसीएस कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक शौषण प्रकरणात आरोपी निदा खान हिला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव येथून तिला अटक केली. तेव्हा तिचा खरा चेहरा, तिचे खरे रूप समोर आले.

Nida Khan: चक्रावून टाकणारा खुलासा...निदा खान तर वेगळीच निघाली! टीसीएस प्रकरणातील आरोपीचा खरा चेहरा पाहिला का?
निदा खान, नाशिक आयटी कंपनीImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 08, 2026 | 8:50 PM
Share

Nida Khan First Look: नाशिक येथील टीसीएस कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणात 42 दिवसांनी मास्टरमाईंड निदा खान हिला अखेर बेड्या ठोकल्या. छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव येथून तिला अटक करण्यात आली. नाशिक गुन्हे शाखा आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. तिला अटक करण्यात आल्यानंतर निदा खानचा खरा चेहरा समोर आला. आतापर्यंत तिचा जो सोशल मीडिया खात्यावरील प्रोफाईल फोटो समोर येत होता, त्यापेक्षा ती वेगळी असल्याचे समोर आले आहे. ही निदा खान तर वेगळीच निघाली अशी प्रतिक्रिया तिला पाहाताच अनेकांनी दिली. यंत्रणांना गुंगारा देण्यासाठी तिने हा बनाव केल्याचे समोर आले आहे. कोणी ओळखू नये यासाठी तिने मुद्दामहून प्रोफाईलवर तो फोटो लावल्याचे समोर आले आहे.

42 दिवसांपासून निदा फरार

नाशिक येथील टीसीएस लैंगिक छळ आणि धर्मांतरण प्रकरणातील मास्टरमाईंड निदा खान ही गेल्या 42 दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होती. अगोदर ठाणे मग मुंब्रा अशा ठिकाणी ती लपल्याचे अगोदर समोर येत होते. पण निदा खान ही छत्रपती संभाजीनगरमधील नारेगावात लपली होती. निदा खान हिला शोधण्यासाठी पोलिसांचे एक पथक 24 तासांपासून काम करत होते. ती 25 मार्चपासून फरार होती. नारेगावातील कैसर कॉलनीतील एका फ्लॅटमधून तिला अटक करण्यात आली.

ते पाच लोक कोण?

निदा खान हिला एमआयएम नगरसेवक मतीन खान यांनी मदत केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आरोपी निदा खान ही कैसर कॉलनीतील या फ्लॅटमध्ये तिची आई, वडील, भाऊ आणि काकीसोबत राहत होती. ती चार दिवसांपूर्वीच या फ्लॅटमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी ती या भागात लपल्याची माहिती मिळाली होती. पण कोणत्याही प्रकारची जोखीम नको म्हणून पोलिसांनी अगोदर या परिसराची आणि फ्लॅटची रेकी केली. त्यानंतर निदा खान हिला अटक केली.

निदा खानचा अटकपूर्व जामीन फेटाळला

निदा खान हिने नाशिक येथील कोर्टात धाव घेतली होती. तिने अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर तिने पुन्हा एकदा गर्भधारणेचे कारण पुढे करत अटकपूर्व जामीनासाठी प्रयत्न केला. विशेष म्हणजे ती इतर आरोपींच्या कोणत्या कोणत्या प्रकारे संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे.याप्रकरणात तिचे साथीदार रजा रफीक मेमन, तौसीफ बिलाल अत्तार, दानिश शेख आणि शाहरुख हुसैन शौकत कुरेशी तुरुंगात आहेत.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?