AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डिअर प्रेसिडेंट… राऊतांच्या त्या ट्विटने एकच खळबळ, बंगालमधील विजयाबद्दल भाजपचे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अभिनंदन, राऊतांनी काय दिलं उत्तर?

Sanjay Raut Tweet on President Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पश्चिम बंगालचा गड जिंकल्याबद्दल भाजपचे अभिनंदन केल्याचे समोर आले. त्याचा संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला.

डिअर प्रेसिडेंट... राऊतांच्या त्या ट्विटने एकच खळबळ, बंगालमधील विजयाबद्दल भाजपचे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अभिनंदन, राऊतांनी काय दिलं उत्तर?
संजय राऊत, डोनाल्ड ट्रम्प, नरेंद्र मोदी Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 08, 2026 | 12:36 PM
Share

Sanjay Raut Tweet on President Donald Trump: भाजपने ममता दीदींच्या हातातून पश्चिम बंगालचा गड खेचून आणला. या निकालानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केल्याचे समोर आले होते. या सर्व घडामोडींवर खासदार संजय राऊत यांनी तुफान बॅटिंग केली आहे. त्यांनी या सर्व प्रकाराबद्दल थेट डोनाल्ड ट्रम्प यांनाच ट्वीट केले आहे. राऊतांनी या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. एका राज्याच्या निवडणुकीत विजय मिळवल्याबद्दल भाजपची पाठ थोपटण्यासारखं काय असा सवाल राऊतांनी विचारला आहे. आता त्यांच्या ट्वीटवरून राजकीय गोटात खमंग चर्चा रंगली आहे.

काय आहे ते ट्वीट?

खासदार संजय राऊत यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाच्या एका एक्स अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत भाजप आणि पंतप्रधान मोदी यांचे पश्चिम बंगालच्या विजयाबद्दल अभिनंदन करण्यात आले. त्यावर एक्सवरूनच संजय राऊत यांनी ट्रम्प यांना एक संदेश पाठवला आहे. ही एक राज्यस्तरावरील निवडणूक होती. राष्ट्रीय स्तरावरील नव्हती. बंगालमधील निवडणूक ही देशातंर्गत बाब आहे. त्यामुळे इतर देशाने त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणे योग्य नाही, अशी खरीखोटी राऊतांनी सुनावली.

बंगालची निवडणूक निष्पक्ष झाली नाही

संजय राऊतांनी एक्सवर इंग्रजीमध्ये एक लांबलचक उत्तर धाडलं आहे. भारतातील खासदार म्हणून मी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केल्यासंबंधींच्या वृत्तावरून हे उत्तर आपणास लिहित असल्याचे त्यांनी ट्रम्प यांना कळवले. या ट्विटमध्ये बंगालची निवडणूक ही राज्यस्तरीय आहे. हा भारतीय लोकशाहीचा अंतर्गत भाग आहे. त्यात बाहेरील देशाच्या व्यक्तीने पाठिंबा देणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.

तर पश्चिम बंगालची निवडणूक ही निष्पक्ष झाली नसल्याचा आरोप राऊतांनी ट्रम्प यांना केलेल्या ट्विटमध्ये केला आहे. या निवडणुकीत धमकी, दबाव आणि भीती दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तर निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे काम केले नसल्याचा आणि भाजपसाठी त्यांनी काम केल्याचा आरोप राऊतांनी या ट्विटमधून केला.

अभिनंदनाची बातमी खोटी

तर आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राऊतांनी ट्रम्प यांच्या त्या ट्विटचा समाचार घेतला. जेव्हा मी हे वाचले की डोनाल्ड ट्रंप यांनी मोदीना अभिनंदन केले. एकतरी ही बातमी खोटी आहे. मला वाटत हे खोट आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. उद्या ग्रामपंचायत जिंकल्यावर मोदीना अभिनंदन करतील. अमेरिका डेमोक्रॅटिक देश आहे आणि भारत सुद्धा आहे. भारतात काय चालले आहे हे विश्वात माहिती आहे. या देशात पश्चिम बंगाल आसाम आणि इतर राज्यात काय खेळ लोकशाहीच्या नावाखाली सुरू आहे हे सगळ्याना माहिती आहे. राहुल गांधी यांनी वारंवार सांगितले आहे. कोणत्या राज्याची पार्टी जिंकत असेल तर डोनाल्ड ट्रंप अभिंदन करतील का? तिकडे युद्ध सुरू आहे असे अनेक काम त्यांच्याकडे आहे. भाजप वाले मोदींची छबी खराब करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. मुळात भाजपने खोटी बातमी पसरवली आहे त्यामुळे आम्ही डोनाल्ड ट्रंपला एक माहिती पोचवली आहे. कोणत्या प्रकारे लोकशाही भारताचे आचके देत आहे हे ट्वीटमधून सांगितल्याचा दावा राऊतांनी केला.

Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?