वकील साहेब तुम्हालाही मुलीबाळी असतील… शिंतोडे उडवू नका; वैष्णवीचे वडील पत्रकार परिषदेत ढसाढसा रडले

वैष्णवी हगवणे प्रकरणात हगवणे कुटुंबीयांच्या वकिलांनी अनेक आरोप केले. त्यानंतर वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांना अश्रू अनावर झाले आहेत.

वकील साहेब तुम्हालाही मुलीबाळी असतील... शिंतोडे उडवू नका; वैष्णवीचे वडील पत्रकार परिषदेत ढसाढसा रडले
Vaishnavi hagavane
Image Credit source: Tv9 Marathi
| Updated on: May 29, 2025 | 3:36 PM

वैष्णवी हगवणे प्रकरणी दररोज वेगवेगळी माहिती समोर येत आहे. सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केलेल्या वैष्णवीवर हगवणेंच्या वकिलांनी अनेक आरोप केले आहेत. या आरोपांना उत्तर देण्यासाठी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषद आयोजीत केली होती. दरम्यान, वकिलांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अनावर झाले आहेत. ते ढसाढसा रडले आहेत.

आईला मारहाणीविषयी सांगितलं

वैष्णवी हगवणेला मृत्यूपूर्वी सलग 8 दिवस वेगवेगळ्या हत्यारांचा वापर करुन पती शशांकने मारहणा केल्याचे पोलिस तपासात समोर आले. याविषयी बोलताना वैष्णवीचे वडील अनिल म्हणाले, ‘सहा ते सात दिवस वैष्णवीला सलग मारहाण झाली. १० तारखेला वैष्णवी घरी आली होती. तेव्हा ती आईला याविषयी बोलली होती. मारहाण होत आहे, छळ करत आहेत. पण नवऱ्याचा, शशांकचा फोन आल्यावर तिला दुसऱ्याच दिवशी जावं लागलं होतं.’

वाचा: हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ करणाऱ्या हगवणेच्या संपत्तीचा आकडा ऐकलात का? बसेल धक्का

वकिलांच्या आरोपवर वडिलांचे उत्तर

हगवणेंच्या वकिलांनी वैष्णवीवर अनेक आरोप केले. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. त्याविषयी बोलताना वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अनावर झाले आहेत. ‘माझ्या मुलीवर काहीही शिंतोडे उडवतील. वकीलांना मला सांगायचं आहे की तुम्ही सुज्ञ आहात. तुम्हालाही मुलीबाळी असतील. एखाद्याच्या असाह्य मुलीवरती… माझी मुलगी तर गेलीच… पण ती मेल्यावर तिच्यावर शिंतोडे उडवू नका. तुम्हालाही मुलं असतील मुली असतील. पण माझ्या लेकराचं हे नका करू. एवढंच सांगायचं आहे.’

पोलिसांचा मोठा खुलासा

संपूर्ण हगवणे कुटुंब सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिस या कुटुंबाची कसून चौकशी करताना दिसत आहेत. आता पोलीस तपासात मोठी माहिती समोर आली आहे. वैष्णवी हगवणेला आत्महत्येपूर्वी, पती शशांक हगवणेकडून वेगवेगळ्या हत्यांरांचा वापर करुन मारहाण करण्यात आली. पोस्टमॉर्टन रिपोर्टमध्ये वैष्णवी हगवणेच्या अंगावर जखमा आढळल्या. त्यामुळे आत्महत्येपूर्वी नेमकं काय घडलं असा प्रश्न सर्वांना सतावत आहेत. वैष्णवीला मारहण्यात करण्यात आलेले हत्यार पोलिसांनी जप्त केले आहेत. सलग 8 दिवस वैष्णवीला वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे