
कोव्हीड घोटाळ्यात ठाकरेंच्या सेनेतील बड्या नेत्याला अटक करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. “बड्या नेत्याला होईल अटक कदाचित. आज सांगू शकत नाही. हे इन्व्हेस्टिगेशनच्या हाती असतं. हा आरोपासाठी आरोप नाही. प्रत्येक घोटाळ्यात घोटाळा सिद्ध झाला. तुरुंगात गेले. त्यांच्या आकांपर्यंत पोहोचण्याचे पुरावे असतील तर पोलीस कारवाई करतील” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुंबई गुजरातला जोडण्याचा प्लान या विरोधकांच्या दाव्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘या पेक्षा मुर्खपणाचं दुसरं स्टेटमेंट असू शकत नाही’. “मुंबईला दोन एअरपोर्टची गरज होती. दुसरा आम्हीच बांधला. विकास थांबला असेल मुंबईचा तर केवळ एका एअरपोर्टने. मुंबईच्या एअरपोर्टचा प्लान मी केला नाही. 1992 पासूनचा प्लान होता. कुणीच काही केलं नाही. मी हे काम हाती घेतले. हा अदानीचा नव्हता. तो जीव्हिकेला आम्ही दिला होता. जीव्हिकेने चार वर्ष काम करून शेअर विकले. ते अदानीने टेकओव्हर केले” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“संपूर्ण देशात बंदर बांधण्यासाठी सर्वात उत्तम जागा वाढवणची आहे. नॅचरल डीप ड्राफ्ट वाढवण सारखं कुठेच नाही. कोणत्याच राज्यात नाही. जगातील मोठं जहाज हे वाढवणलाच येतं. 90 च्या दशकात वाढवण बंदर बांधण्याचा निर्णय झाला. फायनल झालं. त्यावेळी काही लोकं कोर्टात गेले. डहाणूचा हा नॅचरल एरिया आहे. तो खराब होईल. सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. जस्टिस धर्माधिकारींच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. त्यांनी अहवाल दिला. ते बंदर केलं” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आज वाढवण पोर्ट जगातील 10 पोर्टमध्ये
“मी मुख्यमंत्री झाल्यावर माहिती घेतली. मी थोडा अभ्यास केला. आपल्याला नॅचरल एरिया राईट ऑफ वे साठी पाहिजे. मी म्हटलं डीपसी करू शकतो. मी समिती स्थापन केली. त्यांनी योग्य मार्ग शोधला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाची परवानगी घेतली. त्यांनी मान्यता दिली. दीड वर्ष सर्व हियरिंग करून सर्व प्रकारच्या मंजुरी दिली. आज वाढवण पोर्ट जगातील 10 पोर्टमध्ये आहे. भारतातील सर्वात मोठा पोर्ट आहे. भारतातील सर्वात मोठा पोर्ट जेएनपीटी होता. त्यापेक्षा दुप्पट हा पोर्ट आहे” असं फडणवीस म्हणाले.