जळगावात ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने, गुलाबराव पाटील म्हणाले विरोधकांचा पोरखेळ…

| Updated on: Dec 03, 2022 | 2:43 PM

राज्यातील बहुतांश ठिकाणी ग्रामीण भागातील विकासकामांवरून महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे-फडणवीस सरकारमध्ये श्रेयवाद बघायला मिळत आहे.

जळगावात ठाकरे आणि शिंदे गट आमने-सामने, गुलाबराव पाटील म्हणाले विरोधकांचा पोरखेळ...
गुलाबराव पाटील
Image Credit source: Google
Follow us on

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील नगर पालिकेच्या उद्यान शुभारंभाचा सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय, उद्यानाच्या उदघाटनावरून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटात श्रेय वादाचा संघर्ष पाहायला मिळाला आहे, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणाऱ्या शुभारंभ कार्यक्रम अगोदरच उद्धव ठाकरे गटाच्या सेनेकडून उद्यानाचा शुभारंभ करण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे. या विषयावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या विरोधकांच्या वर टीका करताना म्हटल आहे की हा विरोधकांचा पोर खेळ आहे, कारण हे उद्यान जरी आज होत असल तरी यासाठी सर्वांनी प्रयत्न केले आहे. त्याचा सर्वांना उपयोग होणार आहे, या उद्यानासाठी आपण स्थानिक आमदार म्हणून निधीसाठी पाठपुरावा केल्याचं सांगत गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना चांगलंच फटकारले आहे. त्यामुळे जळगावमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात उद्यानाच्या श्रेयवाद चांगलाच टोकाला गेला आहे.

राज्यातील बहुतांश ठिकाणी ग्रामीण भागातील विकासकामांवरून महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे-फडणवीस सरकारमध्ये श्रेयवाद बघायला मिळत आहे.

जळगावमध्येही श्रेयवाद बघायला मिळत असून शिंदे गट आणि ठाकरे गटातही उद्यानाच्या उद्घाटन सोहळ्यावरुन वाद सुरू आहे.

हे सुद्धा वाचा

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणाऱ्या शुभारंभ कार्यक्रम अगोदरच उद्धव ठाकरे गटाच्या सेनेकडून उद्यानाचा शुभारंभ करण्यात आल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे.

यावरून मंत्री गुलाबराव पाटील यांनी संताप व्यक्त केला असून ठाकरे गटावर टीका केली असून विरोधकांचा पोर खेळ सुरू असल्याचे म्हंटले आहे.

सुरुवातीपासूनच गुलाबराव पाटील यांना स्थानिक पातळीवरील ठाकरे गटाच्या पदाधिकऱ्यांनी कडाडून विरोध केला जात आहे. त्याचाच प्रत्यय उद्यानाच्या निमित्ताने समोर आला आहे.