लाईन दुरुस्तीसाठी विजेच्या खांबावर चढला आणि अचानक वीज पुरवठा सुरू झाला; वांगणीतील थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

| Updated on: Jul 17, 2022 | 4:27 PM

वांगणी : काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यक्षात अनुभव महावितरणच्या(Mahavitran ) एका कर्मचाऱ्याला आला आहे. विद्युत खांबावर काम करत असताना अचानक वीज पुरवठा सुरू झाला आणि या कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला. मात्र त्याचे नशीब बलवत्तर म्हणून अनेक लोक त्याच्या मदतीसाठी देवासारखे धावून आले. नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्याचा जीव वाचला आहे. वांगणीमद्ये(Wangani ) […]

लाईन दुरुस्तीसाठी विजेच्या खांबावर चढला आणि अचानक वीज पुरवठा सुरू झाला; वांगणीतील थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद
Follow us on

वांगणी : काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यक्षात अनुभव महावितरणच्या(Mahavitran ) एका कर्मचाऱ्याला आला आहे. विद्युत खांबावर काम करत असताना अचानक वीज पुरवठा सुरू झाला आणि या कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात आला. मात्र त्याचे नशीब बलवत्तर म्हणून अनेक लोक त्याच्या मदतीसाठी देवासारखे धावून आले. नागरिकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे त्याचा जीव वाचला आहे. वांगणीमद्ये(Wangani ) मध्ये ही घटना घडली. या कर्मचाऱ्याला वाचवतानाचा थरारा कॅमेरात कैद झाला आहे. नागरिकांनी केलेल्या मदतीमुळे या कर्मचाऱ्यांचा जीव वाचू शकला. मात्र, यात या कर्मचाऱ्याला किरकोळ दुखापत झाली आहे.

विद्युत खांबावर काम करत असताना विजेचा धक्का लागून महावितरणचा कंत्राटी कर्मचारी जखमी झाल्याची घटना वांगणी मध्ये घडली आहे. मात्र, नागरिकांच्या सतर्कतेमुळे या कर्मचाऱ्याचा जीव वाचलाय, या कर्मचाऱ्याला वाचवण्याचा थरार कॅमेरा मध्ये कैद झाला आहे.

अंबरनाथ तालुक्यातील वांगणी गावात वार्ड क्रमांक चार ,साईनगर भागांमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याची एक ऑन लाईन तक्रार महावितरणला आली होती . या तक्रारीचे निवारण करण्यासाठी महावितरणचा कंत्राटी कर्मचारी नईम शेख हा तक्रार आलेल्या ठिकाणी पोहचला. नईम हा लाईन दुरुस्तीसाठी विजेच्या खांबावर चढला होता. मात्र, अचानक वीज पुरवठा सुरू झाल्याने नईमला विजेचा जोरदार धक्का बसला आणि तो या विजेच्या खांबावरच लटकला.

नईमला विजेच्या खांबाला लटकलेला पाहून नागरीकांचा थरकाप उडाला. त्या वेळेस आजूबाजूच्या नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेत नईम शेख याला विजेच्या खांबावरून सुखरूपपणे खाली उतरून त्याचा जीव वाचवला. त्या नईम शेख ला पुढील उपचारासाठी बदलापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे.

नईम हा विजेच्या खांबावर चढला असताना अचानक वीज पुरवठा कोणी सुरु केला ?नईमला कोणी लाईन दुरुस्ती साठी पाठवले ? या दुर्घटनेची जबाबदारी कोण घेणार असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहे.