IND vs PAK : मॅचच्यावेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा…निलेश राणेंनी मालवणात त्या ठिकाणी थेट बुलडोझरच चालवला

IND vs PAK : टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत रविवारी शानदार विजय मिळवला. परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धूळ चारली. प्रत्येक भारतीयाला या विजयाचा आनंद आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे काही जणांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्यानंतर तिथे राडा झाला.

IND vs PAK : मॅचच्यावेळी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा...निलेश राणेंनी मालवणात त्या ठिकाणी थेट बुलडोझरच चालवला
Nilesh Rane Action
| Updated on: Feb 25, 2025 | 12:15 PM

महाराष्ट्रात कोकणात मालवण येथे भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर एका मुस्लिम व्यक्तीने भारताविरोधात घोषणाबाजी केली होती. त्यानंतर वातावरण तापलं. कुडाळचे शिवसेना आमदार निलेश राणे यांनी त्या व्यक्ती विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. प्रकरण वाढल्यानंतर मालवण नगर परिषद प्रशासनाने आरोपी व्यवसायिकाच्या भंगाराच्या दुकानावर बुलडोझर चालवला. त्याचं दुकान पाडण्यात आलं. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-पाकिस्तान सामना सुरु असताना रोहित शर्माच्या विकेटनंतर दुकान मालकाने कथितरित्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. या दुकान मालकावर झालेल्या कारवाईचा व्हिडिओ शिवसेना नेते निलेश राणे यांनी एक्सवर शेअर केलाय.

“मालवणात एक मुसलमान परप्रांतीय भंगार व्यवसायिकाने काल भारत पाकिस्तान मॅच नंतर भारत विरोधी घोषणा दिल्या. कारवाई म्हणून आम्ही या परप्रांतीय हरामखोराला जिल्ह्यातून हाकलून देणारच पण त्या अगोदर तात्काळ त्याचा भंगार व्यवसाय उध्वस्त करून टाकला. मालवण नगर परिषद प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी ताबडतोब कारवाई केल्याबद्दल त्यांचे आभार” असं निलेश राणे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

विषय पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला

रविवारी भारत-पाकिस्तान सामन्या दरम्यान सिंधुदुर्गात मालवण येथे दोन लोकांनी भारतविरोधी घोषणा दिल्या. स्थानिकांनी याला विरोध केल्यानंतर वाद सुरु झाला. विषय पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचला. त्यानंतर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. सोमवारी सकाळी स्थानिकांनी वास्तव्य करणाऱ्या अवैध बांग्लादेशींविरोधात रॅली काढत कारवाईची मागणी केली.


टीम इंडियाचा आरामात विजय

दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर शानदार विजय मिळवला. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 241 धावा केल्या. पाकिस्तान विकेट राखून ठेवण्याच्या दबावात खूपच सावधतेने फलंदाजी केली. परिणामी त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. टीम इंडियाने 6 विकेट राखून आरामात हे लक्ष्य पार केलं. विराट कोहलीने शानदार शतक झळकवत टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. विराटच हे 51 व शतक आहे.