Abhijeet Dipke : अभिजीत यांनी खुर्ची नाकारली आणि..शाळा ठीक करो अभियान सुरु करताना अभिजीत दीपके यांची मन जिंकणारी कृती

Abhijeet Dipke : आज स्वातंत्र्यदिनीच अभिजीत दीपके यांना एक धक्का बसला. CJP चं अधिकृत इंस्टाग्राम पेज बंद झालं आहे. खु्द सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनीच ही माहिती दिली आहे.

Abhijeet Dipke : अभिजीत यांनी खुर्ची नाकारली आणि..शाळा ठीक करो अभियान सुरु करताना अभिजीत दीपके यांची मन जिंकणारी कृती
Abhijeet Dipke
| Updated on: Aug 15, 2026 | 10:15 AM

जंतर-मंतरवरील यशस्वी विद्यार्थी आंदोलनामुळे देशाच्या राजकारणात अभिजीत दीपके चर्चेचा विषय बनले आहेत. आज देशाचा 80 वा स्वातंत्र्यदिन आहे, त्या निमित्ताने अभिजीत दीपके यांनी शिक्षण व्यवस्थेसाठी एक मोहिम सुरु केली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके यांचा शाळा ठीक करो आजपासून नवीन उपक्रम सुरु केलाय. हिंगोली जिल्ह्यातील त्यांच्या मूळ संतुक पिंपरी गावातून अभिजीत दीपके यांनी उपक्रमाला सुरुवात केलीय. अभिजित दिपके यांच्याहस्ते जिल्हा परिषद शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. शाळेच्या दूरावस्थेला हेच जबाबदार आहेत. संतुक पिंप्री गावातील शाळेच्या पाहणी दरम्यान शाळेच्या खिडकीच्या फुटलेल्या काचांपासून बचाव व्हावा म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो असलेला बॅनर लावला होता. शाळेची खिडकी पोते व बॅनर टाकून झाकण्यात आली होती.

अभिजीत दीपके यांनी हिंगोलीच्या शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अभिजित दिपके यांनी खुर्चीवर बसणं नाकारलं. जमिनीवरच विद्यार्थ्यांसोब रिंगण करून बसले. पालकांसोबत संवाद साधला. पालकांनी सांगितलेल्या समस्या दीपके यांनी ऐकून घेतल्या. तुम्हाला बेंच नाही, तर यांना सुद्धा खुर्च्यावर बसू द्यायचे नाही असं दीपके बोलले. सरपंच आणि शिक्षकांशी संवाद साधल्यानंतर फुटलेल्या काचा दोन दिवसांत रिपेयर करू असं सरपंचांनी सांगितलं. आम्हाला डिजिटल क्लास रूम पाहीजेत असं मुख्याध्यापक म्हणाले. शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेच्या वेगवेगळ्या समस्या मांडल्या.

Sir साठी दुसरे लोक लावा

“सरपंचांना मी धन्यवाद देतो. त्यांनी आठ दिवसांत सर्व सोयी देण्याच आश्वासन दिले आहे. विद्यार्थ्यांना शिकवणे हेच शिक्षकांना एकच काम असले पाहिजे. Sir साठी दुसरे लोक लावा. अनेक बेरोजगार तरुण आहेत” असं ते म्हणाले. मागच्या 10 वर्षांत 94 हजार शाळा बंद पडल्या. 80 वर्षांत शाळेत सुविधा नाहीत, तुम्ही करता काय 50 खोके एकदम ओके” असं अभिजीत दीपके बोलले. आज स्वातंत्र्यदिनीच अभिजीत दीपके यांना एक धक्का बसला. CJP चं अधिकृत इंस्टाग्राम पेज बंद झालं आहे.  सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनीच ही माहिती दिली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us