AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ditwah Cyclone : सावधान! भारताच्या दिशेने वेगाने येतंय संकट, 5 राज्यात हाय अलर्ट, पुढील 24 तास अत्यंत…

Maharashtra Weather Update : देशावर मोठं संकट असून हिटवाह चक्रीवादळ भारताच्या दिशेने वेगाने येतंय. भारताने ऑपरेशन सागर बंधू सुरू केले आहे, ज्या अंतर्गत मदत करण्यासाठी मदत आणि बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत.

Ditwah Cyclone : सावधान! भारताच्या दिशेने वेगाने येतंय संकट, 5 राज्यात हाय अलर्ट, पुढील 24 तास अत्यंत...
Ditwah Cyclone
| Updated on: Dec 01, 2025 | 7:32 AM
Share

हिटवाह चक्रीवादळाने श्रीलंकेत मोठा कहर केला. भारताच्या दिशेने हे वादळ वेगाने येत आहे. तामिळनाडू आणि पुडुचेरीमध्ये पाऊस आणि गडगडाटी वादळाची शक्यता आहे. हेच नाही तर या वादळाचा परिणाम इतरही राज्यात बघायला मिळत आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अगोदरच अलर्ट जारी करण्यात आला. भारतीय हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला हे.  या चक्रीवादळाचा परिणाम कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि बंगालपर्यंत बघायला मिळेल. श्रीलंकेत हा चक्रीवादळाने मोठा कहर केला आणि 200 लोकांचा जीव गेला. आज 1 डिसेंबर 2025 रोजी भारताच्या काही भागात हे चक्रीवादळ पोहोचेल. या चक्रीवादळाचा फटका राज्यातही बसेल. पुढील काही तासांसाठी राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला.

हिटवाह चक्रीवादळ वेगाने भारताच्या दिशेने येतंय…

भारताने ऑपरेशन सागर बंधू सुरू केले आहे, ज्या अंतर्गत मदत करण्यासाठी मदत आणि बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. दिल्लीतील किमान तापमान एक अंकी झाले आहे. उद्या 1 डिसेंबरपासून दिवसभर ताशी 20 ते 25 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ उत्तर वायव्येकडे वाटचाल करत आहे. हिटवाह चक्रीवादळामुळे राज्यात ढगाळ वातावरण राहिल.

श्रीलंकेत हिटवाह चक्रीवादळाचा धुमाकूळ 200 लोकांचा मृत्यू

काही भागात आज पाऊस होण्याचीही शक्यता आहे. राज्यातील काही भागात तापमानात घट दिसून आली. काही भागात तापमानात वाढही बघायला मिळत आहे. उत्तर प्रदेशातही आता तापमान झपाट्याने कमी होत आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, सोमवारपासून वायव्येकडील वाऱ्यांचा वेग वाढेल आणि थंडीचा परिणाम अधिक तीव्र होईल.

भारतातील समुद्रकिनाऱ्यावर अलर्ट जारी 

श्रीलंकेत हिटवाह चक्रीवादळाने धुमाकून घातला. श्रीलंकेच्या मदतीला भारत पोहोचला आणि तिथे मदतकार्य सुरू केले. वादळाच्या पार्श्वभूमीवर भारत अगोदरच अलर्ट असून सुरक्षा पूर्णपणे तैनात करण्यात आली. या वादळाचा परिणाम आज काही भागातील किनारपट्टीवर बघायला मिळत आहे. हे चक्रीवादळ भारताच्या दिशेने वेगाने पुढे सरकताना दिसत आहे. अनेक राज्यात अलर्ट मोड जारी करण्यात आला.

Follow Us
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना
पोलिसांनी अडवलंच तर... मुंबईत होणाऱ्या निर्णायक मराठा आंदोलनाबाबत...
पोलिसांनी अडवलंच तर...  मुंबईत होणाऱ्या मराठा आंदोलनाबाबत मनोज जरांगेंचा मोठा इशारा
गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! कोकणवासीयांचा...
Ganeshotsav 2026 | गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी! माणगावात 7-8 किमी वाहनांच्या रांगा; कोकणवासीयांचा प्रवास रखडला
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
शतकाची परंपरा कायम! सांगलीत दोन दिवस आधीच विराजमान होतो चोर गणपती
पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर... जरांगेंनी जाहीर केला...
Manoj Jarange Patil | पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार, नंतर आझाद मैदानावर... जरांगे पाटलांनी जाहीर केला महामोर्चाचा मेगा प्लॅन
कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय!
Manoj Jarange Patil | कुठल्याही मार्गाने गेलो तरी मुंबईतच जायचंय, जिंकूनच यायचंय! मनोज जरांगे पाटलांचा ठाम निर्धार
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या...
ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या हालाचली; तामिळनाडूच्या दिग्गज नेत्या पोहोचल्या भेटीला
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट...
सरकारचा OYO चालकांना सर्वात मोठा दणका; चुक खपवली जाणार नाही थेट... संपूर्ण रेकॉर्ड ठेवावा लागणार
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू,
माझा भाऊ शांततापूर्वकच... अमृता फडणवीसांनी पुन्हा एकदा मांडली बाजू, मनोज जरांगेंबाबत मोठं विधान