
हिटवाह चक्रीवादळाने श्रीलंकेत मोठा कहर केला. भारताच्या दिशेने हे वादळ वेगाने येत आहे. तामिळनाडू आणि पुडुचेरीमध्ये पाऊस आणि गडगडाटी वादळाची शक्यता आहे. हेच नाही तर या वादळाचा परिणाम इतरही राज्यात बघायला मिळत आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून अगोदरच अलर्ट जारी करण्यात आला. भारतीय हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला हे. या चक्रीवादळाचा परिणाम कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि बंगालपर्यंत बघायला मिळेल. श्रीलंकेत हा चक्रीवादळाने मोठा कहर केला आणि 200 लोकांचा जीव गेला. आज 1 डिसेंबर 2025 रोजी भारताच्या काही भागात हे चक्रीवादळ पोहोचेल. या चक्रीवादळाचा फटका राज्यातही बसेल. पुढील काही तासांसाठी राज्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला.
हिटवाह चक्रीवादळ वेगाने भारताच्या दिशेने येतंय…
भारताने ऑपरेशन सागर बंधू सुरू केले आहे, ज्या अंतर्गत मदत करण्यासाठी मदत आणि बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. दिल्लीतील किमान तापमान एक अंकी झाले आहे. उद्या 1 डिसेंबरपासून दिवसभर ताशी 20 ते 25 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ उत्तर वायव्येकडे वाटचाल करत आहे. हिटवाह चक्रीवादळामुळे राज्यात ढगाळ वातावरण राहिल.
श्रीलंकेत हिटवाह चक्रीवादळाचा धुमाकूळ 200 लोकांचा मृत्यू
काही भागात आज पाऊस होण्याचीही शक्यता आहे. राज्यातील काही भागात तापमानात घट दिसून आली. काही भागात तापमानात वाढही बघायला मिळत आहे. उत्तर प्रदेशातही आता तापमान झपाट्याने कमी होत आहे. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, सोमवारपासून वायव्येकडील वाऱ्यांचा वेग वाढेल आणि थंडीचा परिणाम अधिक तीव्र होईल.
भारतातील समुद्रकिनाऱ्यावर अलर्ट जारी
श्रीलंकेत हिटवाह चक्रीवादळाने धुमाकून घातला. श्रीलंकेच्या मदतीला भारत पोहोचला आणि तिथे मदतकार्य सुरू केले. वादळाच्या पार्श्वभूमीवर भारत अगोदरच अलर्ट असून सुरक्षा पूर्णपणे तैनात करण्यात आली. या वादळाचा परिणाम आज काही भागातील किनारपट्टीवर बघायला मिळत आहे. हे चक्रीवादळ भारताच्या दिशेने वेगाने पुढे सरकताना दिसत आहे. अनेक राज्यात अलर्ट मोड जारी करण्यात आला.