Mumbai Weather : मुंबईत धो धो पाऊस, मोठा इशारा, पुढील 3 तास धोक्याची, थेट..
Monsoon Update : राज्यात मॉन्सूनने हजेरी लावली. मुंबईत सकाळपासूनच जोरदार पावसाला सुरूवात झाली. ढगाळ वातावरण असून जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील 3 तासासाठी मोठा इशारा देण्यात आला.

मुंबईकरांची अखेर पावसाची मोठी प्रतिक्षा संपली आहे. मॉन्सून दाखल झाला. आज मुंबईच्या अनेक भागात पाऊस सुरू आहे. वातावरणात गारवा पसरला आहे. राज्यभरात मॉन्सून पूर्णपणे सक्रिय होईल. यंदा दरवर्षीच्या तुलनेत पाऊस उशीरा दाखल झाला. जूनचा शेवटचा आठवडा मॉन्सून राज्यात दाखल होण्याकरिता लागला. यासोबतच मुंबईमध्ये पाणीटंचाईचे मोठे संकट उभे होते. दरम्यान, हवामान विभागाने पावसाबाबत एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, 23 जून रोजी नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी महाराष्ट्रात प्रगती झाली. ज्यामुळे मुसळधार पाऊस कोसळेल. मान्सूनची उत्तरेकडील सीमा पुणे, निजामाबाद, दंतेवाडा, बलांगीर,अलिबाग, सुंदरगड, गया आहे. या भागातून मॉन्सून वाटचाल करत आहे. पुढील 48 तासांत परिस्थिती अनुकूल राहील, ज्यामुळे नैऋत्य मान्सूनला मुंबईसह महाराष्ट्राच्या उर्वरित भागांत आगेकूच करण्यास मदत होऊ शकेल.
मुंबईसह उपनगरांमध्ये मॉन्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबई शहर आणि उनगरात मुसळधार पाऊस आज होईल. आज मुंबईला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला. सकाळपासून मुंबईत पावसाची जोरदार हजेरी असून ढग दाटून आली आहेत. कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, गोरेगाव, दहिसरमध्ये मान्सून पुन्हा सक्रीय झाला. कांदिवलीत जोरदार पाऊस सुरू आहे.
मुंबई उपनगरात मान्सूनने पुन्हा एकदा जोर धरला आहे. कांदिवली, बोरिवली, मालाड, अंधेरी, गोरेगाव, दहिसर या संपूर्ण पट्ट्यात पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईतमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने नागिरकांना मोठा दिलासा मिळत आहे. आज मुंबईला यलो अलर्ट पावसाचा जारी करण्यात आला. यासोबतच पुढील काही तासात पावसाचा वेग वाढण्याची शक्यता आहे.
पुढील 3 तासात मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस येण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला. नाशिकला पावसाचा आज यलो अलर्ट जारी करण्यात आला. काल शहरातील काही परिसरात पावसाचा तुरळक शिडकाव झाला. कमाल तापमानात देखील मागील 24 तासात घट झाली. काही भागात आता पावसाला सुरूवात झाली.