विदर्भासह या जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा, पुढील 24 तास धोक्याची, तब्बल..

Maharashtra Weather : राज्यात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. यासोबतच पावसाचा मोठा इशारा दिलाय.

विदर्भासह या जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा, पुढील 24 तास धोक्याची, तब्बल..
Maharashtra Weather
| Updated on: Aug 14, 2026 | 7:40 AM

राज्यात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. त्यामध्येच आज भारतीय हवामान विभागाने मोठा इशारा दिला. विदर्भात पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. मुजफ्परनगर बारबांकी येथे तीव्र कमी दाबाचा पट्टा वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर सक्रिय आहे. भारतात समुद्र सपाटीपासून 3.1 ते 7.6 किलोमीटर उंचीवर हवेचे जोडक्षेत्र सक्रिय झाले. ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला. विदर्भातही पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. राज्यात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. पुढील 24 तासासाठी भारतीय हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला. जुलैनंतर ऑगस्ट महिन्यातही चांगला पाऊस होताना दिसतोय.

राज्यात काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा 

आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. जळगाव शहरातील मेहरून तलावाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली असून तलाव 78 टक्क्यांपर्यंत भरला आहे. मेहरूण तलावाच्या गणेशघाटावरील पायऱ्या ह्या तलावाच्या पाणी साठ्यात वाढ होण्याचं या प्रमाण असून साठ्यात वाढ झाल्याने गणेश घाटाच्या सात पायऱ्या पाण्यात बुडाल्या आहेत.

धरणातील पाणीसाठ्यात कमालीची वाढ

दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे मेहरून तलावात पाण्याची आवक वाढली असून पाणीसाठा वाढल्याने नागरिकांमध्ये आनंदाच वातावरण आहे. 30 व 31 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे तलावाच्या पाणी साठ्यात जवळपास 30 टक्क्यांपर्यंत वाढ झाली होती.परिसरातील सार्वजनिक विहिरी कूपनलिका तसेच शेतातील विहिरीचे स्त्रोत हे मेहरूण तलावाच्या पाणी साठ्यावर अवलंबून असतात.

14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा 

यंदा तीव्रतेचा उन्हाळा असल्यामुळे मेहरून तलावाच्या पाणी साठ्यात मोठी घट होऊन पाणीसाठा 40 टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. पुढील 12 तासांत दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश आणि बिहारसह देशातील 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसासह वादळ होण्याची शक्यता आहे. या काळात काही भागांत वाऱ्याचा वेग ताशी 70 ते 80 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसारख्या डोंगराळ राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे दरडी कोसळण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. देशात पावसाचा हाहाकार उडाल्याचे बघायला मिळतंय.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us