पुन्हा कोसळणार पाऊस! मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रावर संकट, शेतकरी चिंतेत, थेट..

राज्यातील काही भागात मागील काही दिवसांपासून पाऊस सतत हजेरी लावताना दिसत आहे. त्यामध्येच आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. काही जिल्ह्यांमध्ये आजही अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे.

पुन्हा कोसळणार पाऊस! मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रावर संकट, शेतकरी चिंतेत, थेट..
Rain Warning
| Updated on: Mar 23, 2026 | 7:12 AM

राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. मार्च महिना संपत आलेला असतानाही पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. सतत अवकाळी पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. त्यामध्येच आता पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. राज्यात अवकाळी पावसाचे सावट कायम आहे. मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र या भागात आजही अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. यासोबतच राज्यातील इतर भागात उन्हाचा चटका अधिक तीव्र होणार आहे. भारतीय हवामान विभागाने कोकणात आज उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा दिला. आज सांगली, सातारा, धाराशिव, लातूर, सोलापूर या भागात पावसाचा इशारा देण्यात आला. मागील काही दिवसांपासून लातूर जिल्ह्यात सतत अवकाळी पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामध्येच आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

कोकणात आज उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा असला तरीही राज्यातील इतर भागात ढगाळ वातावरणासह पाऊस येण्याची शक्यता आहे. आज राज्यातील हवामान सतत चढउतार बघायला मिळेल. राज्यासह देशातील अनेक भागात पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. राज्यातील मागील चार ते पाच दिवसांपासून सतत काही भागात अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. या अवकाळी पावसांमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे.

जळगावच्या धरणगाव तालुक्यातील वराड येथे वादळी वाऱ्यामुळे चार एकरावरील ज्वारी जमीनदोस्त झाली. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्याची चार एकरवरील ज्वारी पूर्णपणे आडवी पडली असून लाखांचे नुकसान झाले आहे. तब्बल 100 क्विंटल ज्वारीचे उत्पन्न आले असते. मात्र वादळी वाऱ्याने नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्याने दिली आहे

हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी शेतकरी हतबल झाला असून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे . गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हवामानात मोठा बदल झाला असून अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला आहे. निफाड तालुक्यात 18 मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटने सहा गावातील 396 शेतकऱ्यांचे 165 हेक्टरवरील कांदा, गहू द्राक्ष शेतीचे नुकसान झाले तर दुसऱ्या दिवशी 19 मार्च रोजी 16 गावातील 1364 शेतकऱ्यांचे 622 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष, कांदा, गहू, मिर्ची नुकसान झाले.

Follow Us