IMD Weather Update : पुन्हा कोसळणार पाऊल! तब्बल इतक्या जिल्ह्यांवर मोठे संकट, हवामान विभागाने..

मागील काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पाऊस हजेरी लावताना दिसत आहे. आताही भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा अत्यंत मोठा इशारा देण्यात आला.

IMD Weather Update : पुन्हा कोसळणार पाऊल! तब्बल इतक्या जिल्ह्यांवर मोठे संकट, हवामान विभागाने..
Rain
| Updated on: Mar 21, 2026 | 7:22 AM

गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल होताना दिसत आहेत. कधी उष्णता तर कधी पाऊस अशी स्थिती आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. राज्यातील अनेक भागात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सतत पाऊस पडताना दिसत आहे. नुकताच पाऊसच नाही तर गारपिटही होत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. मार्च महिन्यातही पाऊस पडत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाकडून नुकताच अत्यंत मोठा इशारा देण्यात आला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजही राज्यातील काही भागात वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. अनेक भागात पावसाने गारपिटीचा दणका दिला आहे. त्यामध्येच पुन्हा एकदा पावसाचा अंदाज आहे. आज राज्यातील अनेक भागात पाऊस होणार असून हवामानात चढउतार बघायला मिळेल.

आज दुपारनंतर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. नांदेड, लातूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 ताशी किलोमीटर वेगाने वारे वाहतील आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. यादरम्यान या जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात पुढील काही दिवस पाऊस राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

पावसामुळे 51 हजार हेक्टरवर नुकसान रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांना फटका बसला असल्याची माहिती आहे. राज्यात गेल्या चार दिवसात झालेल्या पाऊस वादळी वारे आणि गारपिटीमुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. 16 मार्च ते 20 मार्च दरम्यान राज्यातील विविध ठिकाणी 24 जिल्ह्यांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला. राज्यभरात सुमारे 51,488.54 हेक्टर क्षेत्रात वरील पिकांचे नुकसान झाले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली तालुक्यातील शेलूद शिवारात अवकाळी पाऊस आणि गारपीटने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी कौतिकराव इंगळे यांनी आपल्या दोन एकर शेतापैकी एक एकर शेतात केळी पिकाची लागवड केली. काल केळी पिक चांगले दिसत होते, मात्र दुपारी आलेल्या गारपिटी ने केळीची संपूर्ण पाने फाटली आणि काळे डाग पडत आहेत..पुढील काळात गारपीट ने केळी वर आणखी रोगराई येण्याची शकता असून उत्पादनात घट येऊ शकते.

Follow Us