
देशासह राज्यात मागील काही दिवसांपासून वातावरण सातत्याने बदलताना दिसत आहे. नोव्हेंबरच्या सुरूवातीला पाऊस त्यानंतर कडाक्याची थंडी आणि आता पुन्हा एकदा पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. सध्या उन्हाळ्यासारखी गरमी जाणवत आहे. वायू प्रदूषणही वाढले असून आरोग्याला धोका निर्माण झाला. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. भारताच्या सागरी किनारपट्टीवर मागील काही काळापासून सातत्याने कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. त्यामध्येच आता थेट चक्रीवादळ येणार आहे. एक नवे संकट देशाच्या सागरी हद्दीत घोंगावत असल्याचे म्हटले जात आहे. भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, दक्षिण पश्चिम बंगालचा उपसागर आणि श्रीलंकेच्या किनारपट्टीनजीक एक नवी चक्रीवादळसदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे. ज्यामुळे मोठा धोका निर्माण झाला.
या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पुडुचेरी आदी भागात अलर्ट जारी केला. बंगालच्या खाडीत आलेले वादळ चक्रीवादळात रूपांतरीत होईल. यामुळे आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागात 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. लोकांना सावध राहण्याबाबत अलर्ट जारी करण्यात आला. यासोबतच चक्रीवादळाच्या काळात घराबाहेर न पडण्याचाही इशारा देण्यात आलाय.
भारतीय हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, चैन्नई, कांचीपुरम, तिरूवल्लूर, विल्लुपुरम या भागात मुसळधार पाऊस होईल. याठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला. या चक्रीवादळादरम्यान आंध्र प्रदेशच्याही काही भागात अतिमुसळधार पाऊस होईल. महाराष्ट्रातील काही भागात पाऊस हजेरी लावण्याचे संकेत आहेत. या चक्रीवादळाचा राज्यातही फटका बसेल. मात्र, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूच्या तुलनेत कमी. राज्यात पावसाचे गेलेले ढग पुन्हा एकदा परत येताना दिसत आहेत.
कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण असेल आणि वाऱ्यासह पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवरही सोसाट्याचा वारा सुटेल. हे कमी दाबाचे क्षेत्र 17 किमी प्रतितास इतक्या वेगाने उत्तर पश्चिमेस पुढे जाणार असून 30 नोव्हेंबर 2025 च्या सकाळच्या सुमारास उत्तर तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकेल. या चक्रीवादळापूर्वीच प्रशासनाकडून तयारी केली जात आहे.