AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Weather Update : मोठा अलर्ट जारी, थंडीच्या लाटेचा इशारा, राज्यात तब्बल…

Maharashtra Weather Update : देशात सातत्याने हवामानात बदल होताना दिसत आहे. चक्रीवादळानंतर आता पुन्हा एका उत्तरेकडून थंड वारे येत आहे. राज्यात थंडीची लाट निर्माण झाली आहे.

Maharashtra Weather Update : मोठा अलर्ट जारी, थंडीच्या लाटेचा इशारा, राज्यात तब्बल...
Maharashtra Weather
| Updated on: Dec 02, 2025 | 8:26 AM
Share

राज्यासह देशात मागील काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होताना दिसत आहे. राज्यातील पारा घसरला असून थंडीची लाट पसरली आहे. बहुतांश जिल्ह्यातील किमान तापमान 9 ते 10 अंशांपर्यंत खाली आले आहे. पुढील 48 तासांत धुळे, नंदुरबार, जळगांव, नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात किमान तापमानात घट होऊन थंडीची लाट येण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे हुडहुडी भरविणारी कडाक्याच्या थंडीची लाट सर्वत्र पसरली आहे. हवामानातील बदलामुळे मागील दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील किमान तापमानात बहुतांश जिल्ह्यात किमान तापमान 9 अंशांपर्यंतखाली गेले. 15 ते 18 अंश सेल्सिअसपर्यंत गेलेले किमान तापमान आज 9 अंशापर्यंत खाली आले आहे.

चक्रीवादळानंतर संपूर्ण राज्यात थंडीचा कडाका 

गोंदिया जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून पुन्हा एकदा थंडीचा जोर चांगलाच वाढलेला आहे. तापमानात अचानक घट झाल्याने नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे. गोंदिया जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये सकाळच्या सुमारास दाट धुक्याने अक्षरशः चादर पांघरली. रस्त्यावर काही मीटर अंतरावरही पुढील व्यक्ती किंवा वाहन स्पष्ट दिसत नाहीये.

डिसेंबरमध्ये राहणार राज्यभर थंडीची लाट 

काही दिवसांपूर्वी राज्यातील थंडी गायब झाली होती. नोव्हेंबरच्या सुरूवातीच्या आठवड्यात राज्यात पाऊस होता. त्यानंतर गारठा वाढला. मात्र, दोन ते तीन दिवसांपासून थंडी चक्रीवादळामुळे कमी झाली होती आणि अनेक भागात पावसाचा इशारा देण्यात आला होता. आता पुन्हा राज्यात गारठा वाढला आहे. हेच नाही तर भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांमध्ये गारठा अधिक वाढण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभागाचा मोठा अंदाज 

विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाचा आहे. संपूर्ण डिसेंबर महिनाभर थंडी कायमच राहिल.मागील काही दिवसांमध्ये गारठा वाढल्याने राज्यातील काही भागातील पारा 6 अंशांपर्यंत गेला होता. हिटवाह चक्रीवादळामुळे राज्यातील तापमान कमी अधिक होताना दिसत आहे. राज्यात आता सर्वत्र गुलाबी थंडीचा अनुभव घेता येईल.

Follow Us
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार..
एकनाथ शिंदेंचं लंडनमधील भाषण, वडापाव खातानाचा Video; राऊतांची जोरदार टीका
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा, बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप
गणेशोत्सवात अमित शहांचा मुंबई दौरा; बड्या नेत्याने घेतला तीव्र आक्षेप, म्हणाले पोलिसांना ताण...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा...
बुलढाण्यात भाजपला मोठा धक्का! बड्या नेत्यासह 12 जणांवर गंभीर गुन्हा दाखल, महिलेला...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या...
दिशा सालियन प्रकरणात मोठे वळण, वकिलांच्या विधानाने बड्या नेत्याच्या अडचणी वाढल्या?
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात...
सोलापूरमध्ये लक्ष्मण हाके यांच्याशी तरुणांची झटापट, तिघांविरोधात तक्रार
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...