
इंडिगो एअरलाइन्सच्या गोंधळामुळे प्रवाशांना सुरू असलेला मनस्ताप आठवड्याभरानंतरही कायम आहे. इतके दिवस उलटूनही इंडिगोची विमानसेवा विस्कळीत असून एकही उड्डाण वेळेवर होत नाहीये, अनेक फ्लाईट्स रद्द होत आहे. विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. T1 वरून अनेक फ्लाइट रद्द झाल्या आहेत, तर आज दिवसभरात 46 फ्लाइट उड्डाण भरणार आहेत, असं समजतं. मात्र उड्डाण भरणारी विमानंदेखील उशिरा धावत असल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत. अनेकांना महत्वाची कामं आहे, मीटिंग्स खोळंबल्या आहेत. एका कुटुंबाला तर त्यांच्या नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी जायचं होतं, तिथे गावात मृतदेह ठेवलाय, पण त्यांचे नातेवाईक मात्र विमानतळावर अडकून पडले आहेत. या सगळ्या गदारोळामुळे नागिरक खूपच संतापले आहेत, त्यांचा रोष व्यक्त करत आहेत.
मुंबई विमानतळावर इंडिगोची अडचण कायम आहे. T1 वरून 55 फ्लाइट मधील 9 फ्लाइट रद्द आज दिवसभरात 46 फ्लाइट्सचे उड्डाण होणार आहे. रद्द झालेल्या फ्लाइट मधील प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडून तात्पुरता रेल्वे तिकीट काउंटर सुरू आहेत. मात्र काऊंटरवर प्रवासाची फक्त चौकशी होत आहे. तर इंडिगो एअरलाइन्स उड्डाणाच्या ऑनलाइन बुकिंग सेवा सुरू करण्यात आल्या असल्या तरीही प्रवाशांनी मात्र इंडिगोकडे पाठ फिरवली आहे. अनेक प्रवासी हे इंडिगो कंपनीची सेवा घेत नसल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.
गावात मृतदेह पडून पोहोचायचं कसं ?
इंडिगो एअरलाइन्स कडून सेवा नियोजित वेळेवर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण ज्या फ्लाईट्सचे उड्डाण होणार आहे. त्याही वेळेवर नसून बराच उशीर होत असल्याने प्रवाशांच्या रागाचा पारा चढला आहे. सुरू असलेल्या फ्लाईट देखील उशिराने सुरू असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. त्यातच एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. आपल्या नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी दरभंगाला जाण्यासाठी एक कुटुंब गुजरात वरून रात्रभर प्रवास करत विमानतळावरती आलं, पम इंडिगोचीसेवा कोलमडल्यामुळे त्यांनाही विमानतळावर ताटकळतच उभं रहावं लागलं आहे. यूपीच्या दरभंगांमध्ये काल हृदयविकारांनी मोहम्मद इतिहाब नावाच्या व्यक्तीच्या मृत्यू झाला. त्याचे नातेवाईक गुजरातमध्ये राहत असून इमर्जन्सीसाठी इंडिगोच्या विमानाने जाणार होते. मात्र इंडिगोची विमानसेवा विस्कळीत असल्याने आता ते वेळेवर पोचू शकत नसून त्या व्यक्तीचा मृतदेह तसाच पडून असल्याची माहिती देखील त्यांच्या नातेवाईकांनी दिलेली आहे. दु:खद प्रसंगी त्यांना गावात पोहोचायचं आहे, तिथे नातेवाईकांचा मृतदेह ठेवला आहे, पण विमानसेवा विस्कळीत असल्याने तिथपर्यंत पोहोचायचं कसं असाच प्रश्न त्या शोकव्हिवल कुटुंबाला पडला आहे.
इंडिगोची नाशिक- दिल्ली विमानसेवा 3 दिवस रद्द
इंडिगो विमान सेवेचा गोंधळ अद्याप सुरूच असून सर्व प्रकारचे संचलन सुरळीत करण्यासाठी 8 ते 11 डिसेंबर पर्यंत संध्याकाळची दिल्ली-नाशिक विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. इंडिगो कंपनीकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे. अपुरे कर्मचारी आणि हवामानातील बदल यामुळे विमान सेवेवर परिणाम झाल्याची चर्चा असून लवकरच परिस्थिती पूर्ववत केली जाणार असल्याचे सांगितले जाते आहे. विस्कळीत विमानसवेमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे.