शुभ मुहूर्त ठरला! इंदोरीकर महाराजांच्या मुलीची लग्नपत्रिका व्हायरल, लग्न कधी? कुठे? प्रमुख पाहुणे कोण कोण?
Indorikar Maharaj Daughter Marriage : इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नची पत्रिका समोर आली आहे. या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती देण्यात आली आहे. लग्न कधी आहे आणि किती वाजता आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

राज्यातील प्रसिद्ध किर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज नेहमीच चर्चेत असतात. काही महिन्यांपूर्वी मुलीच्या साखरपुड्यात मोठ्या प्रमाणात खर्च केल्याने ते चर्चेत आले होते. लग्न साधे करा, खर्च कमी करा असं म्हणणार्या इंदोरीकर महाराजांनी मुलीच्या साखरपुड्यात लाखोंचा खर्च केला होता. त्यामुळे त्यांच्यावर सडकून टीकाही झाली होती. अशातच आता इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नची पत्रिका समोर आली आहे. या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
कधी आहे लग्न?
इंदोरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा विवाह प्रसिद्ध उद्योजक सुनील विष्णू चिलप यांचा मुलगा साहिल यांच्याशी होणार आहे. रविवार दिनांक 3 मे 2026 रोजी सायंकाळी 6.50 मिनिटांनी पार पडणार आहे. एस आर थोरात डेअरी जवळ राजापूर रोड, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथे पार पडणार आहे. त्याआधी 2 मे रोजी सायंकाळी 6 वाजता मालपाणी हेल्थ क्लब, संगमनेर येथे हळदी समारंभ पार पडणार आहे. या विवाह सोहळ्याला वारकरी सांप्रदायातील अनेक दिग्गज किर्तनकार आणि समाज प्रबोधनकार हजर राहून आशीर्वाद देणार आहेत. तसेच विवाहाच्या दिवशी 4.30 ते 6.30 या कालावधीत ह. भ. प. डॉ नारायण महाराज जाधव (आळंदी) यांचे किर्तन होणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांना निमंत्रण ?
इंदोरीकर महाराज यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपल्या मुलीच्या लग्नाची पत्रिका दिली आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी इंदोरीकर महाराज यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत लग्नाचे निमंत्रण दिले. साखरपुडा झाल्यानंतर ट्रोल झाल्यानंतर इंदोरीकर महाराज यांनी मुलगी ज्ञानेश्वरीचा विवाह अधिक थाटामाटत करणार अशी भूमिका जाहीर केली होती, त्यानंतर आता हे लग्न अधिक थाटामाटात होणार आहे.
इंदोरीकर महाराजांचा जावई काय करतो?
इंदोरीकर महाराज यांचे होणारे जावई साहिल चिलाप हे बांधकाम व्यावसायिक असल्याची माहिती समोर येत आहे, त्यांचा मुंबईमध्ये मोठा व्यावसाय आहे. समोर आलेल्या माहितीनुसार साहिल चिलाप हे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नरमधील मुळचे रहिवासी आहेत, ते उच्च शिक्षित असून, गावाकडे त्यांची मोठी बागायती शेती आहे. त्यामुळे आता या विवाह सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.