Indurikar Maharaj : इंदोरीकर महाराज किती शिकले? कीर्तनकार झाले नसते तर या क्षेत्रात कमावलं असतं नाव, प्रत्येकाला ..

इंदोरीकर महाराज हे केवळ लोकप्रिय कीर्तनकार नाहीत, तर उच्चशिक्षितही आहेत. त्यांनी बीएस्सी आणि बीएडची पदवी संपादन केली आहे. ते शिक्षक म्हणून काम करतात. पण त्यांचा अधिक फोकस कीर्तनावर आहे. ओझर (बु.) येथील त्यांच्या खंडेराव पाटील विद्यालयात 210 विद्यार्थी शिक्षण घेतात. यातील बहुतांश विद्यार्थी व विद्यार्थिनी निराधार असून या सर्वांचा खर्च इंदोरीकर महाराज उचलतात. भाकड जनावरांचे ते संगोपन करतात. अनेक मंदिरांची डागडुजी त्यांनी स्वखर्चाने केलेली आहेत. पण कीर्तनकार झाले नसते तर ते आदर्श शिक्षक म्हणून नावारूपाला आले असते. त्यांच्या शिक्षणाची माहिती, त्यांचे खरे नाव आणि त्यांची लोकप्रियता या लेखात सविस्तरपणे दिली आहे, जे प्रत्येक चाहत्याला माहीत असायला हवे.

Indurikar Maharaj : इंदोरीकर महाराज किती शिकले? कीर्तनकार झाले नसते तर या क्षेत्रात कमावलं असतं नाव, प्रत्येकाला ..
इंदोरीकर महाराजांचं शिक्षण किती ?
Image Credit source: social media
| Updated on: May 03, 2026 | 2:53 PM

इंदोरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अर्थात कोणताही वाद झालेला नाही. चांगल्या अर्थाने चर्चेत आले आहेत. आज इंदोरीकर महाराज यांच्या घरात सनईचौघडे वाजणार आहेत. त्यांची अत्यंत लाडकी लेक ज्ञानेश्वरी हिचा आज विवाह पार पडत आहेत. नवी मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती सुनील चिलप यांचे चिरंजीव साहिल हिच्याशी ज्ञानेश्वरी लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. या निमित्ताने चिलप आणि इंदोरीकर कुटुंब हे नातेबंधनात अडकणार आहेत. इंदोरीकर यांचा जावई इंजीनिअर आहे. तर मुलगी ज्ञानेश्वरी ही एमसी डीसीएस झाली आहे. जावई आणि मुलगी उच्चशिक्षित असले तरी इंदोरीकर महाराजही काही कमी शिकलेले नाहीत. इंदोरीकर महाराजांचं शिक्षणही चांगलं झालं आहे. इंदोरीकर महाराज कीर्तनकार झाले नसते तर आज ते वेगळ्या क्षेत्रात नावारुपाला येऊ शकले असते.

जग ज्यांना इंदोरीकर महाराज म्हणून ओळखतं, त्या इंदोरीकर महाराजांचं खरं नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख आहे. पण कीर्तन करत असल्याने त्यांना जग इंदोरीकर महाराज म्हणून ओळखतं. इंदोरीकर महाराज हे मूळचे अहिल्यानगरमधील अकोले तालुक्यातील इंदोरी गावच आहेत. त्यामुळे गावाच्या नावावरूनच त्यांना इंदोरीकर महाराज म्हणून सर्व ओळखत आहेत. त्यांनाही आपली ही ओळक अभिमानास्पद वाटते. इंदोरीकर महाराज म्हटल्यावर त्यांनाही मन भरून आल्यासारखं वाटतं.

किती शिकले इंदोरीकर महाराज ?

इंदोरीकर महाराज इतर कीर्तनकारांप्रमाणेच उच्चशिक्षित आहेत. इंदोरीकर महाराज चक्क सायन्सचे पदवीधर आहे. त्यांनी बीएस्सी, बीएड केलंय. ते जर कीर्तनकार झाले नसते तर आदर्श शिक्षक म्हणून नावारुपाला आले असते. पण एवढ्या मोठ्या डिग्र्या असूनही त्यांनी कीर्तन क्षेत्रात प्रवेश केला. आपल्या नर्म विनोदी शैलीतून समाजाचं प्रबोधन करण्यावर त्यांनी भर दिला. त्यांची ही नर्म विनोदी शैलीच त्यांची ओळख बनली. आपल्या नर्म विनोदी शैलीतून लोकांना हसवण्याचं काम ते करतात. पण कधी कधी त्यांच्या काही वादग्रस्त विधानामुळे ते वादातही सापडले आहेत. त्यांना अनेकदा त्यासाठी माफीही मागावी लागली आहे.

वादग्रस्त तरीही लोकप्रिय

स्त्रीयांबद्दलच्या त्यांच्या मतांनी इंदोरीकर महाराज नेहमी वादग्रस्त ठरले आहेत. पण वादग्रस्त ठरले तरी त्यांचा चाहता वर्ग कमी झालेला नाही. राज्यभरात त्यांच्या कीर्तनाचे लाखो चाहते आहेत. मोठी बिदागी देऊन त्यांना आजही कार्यक्रमाला बोलावलं जातं. सोशल मीडियावर त्यांच्या व्हिडिओंवर लाइक्सचा पाऊस पडतो. त्यांच्या मुलीचा साखरपुडा झाला. तेव्हा हजारो चाहते या साखरपुड्याला हजर होते. यावरून इंदोरीकर महाराजांची लोकप्रियता तसूभर कमी झाली नसल्याचं दिसून येतं.

Follow Us