
कीर्तनातून आयुष्यभर लोकांना उपदेश करणारे, साधेपणाने रहा, लग्नात उधळपट्टी नको, कर्ज काढून राजेशाही लग्न करू नका असं सांगणारे प्रसिद्ध समाजप्रबोधनकार इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. त्याचं कारणही आत्तापर्यंत सगळ्यांना कळलं असेलच. लोकांना साधेपणाने लग्न करण्यास सांगणाऱ्या इंदुरीकर महाराजांनी , त्यांच्या लाडक्या लेकीच्या साखरपुड्यात मात्र पाण्यासारखा पैसा खर्च केला. नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीला संगमनेरच्या वसंत लॉन्समध्ये तीन-साडेतीन हजार लोकांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा शाकरपुडा थाटामाटात संपन्न झाला. त्यावर करण्यात आलेल्या खर्चामुळे इंदुरीकर महाराज यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकास्त्र सोडण्यात आलं असून सोशल मीडियावर तर लोकांनी त्यांना ट्रोल करून नकोस केलं.
सततच्या ट्रोलिंगला वैतागलेल्या इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या कीर्तनांमधून या टीकाकारांवरच निशाणा साधला. मी कसे कष्ट केले, कसा संसार केला, वगैरे वगैरे सांगत त्यांनी टीकाकारांवरच हल्ला चढवला. एवढं कमी की काय म्हणून त्यांनी थेट त्यांचा फेटा खाली ठेवण्याचा इशारा दिला, म्हणजेच आता कीर्तनसेवा थांबवेन असे संकेतही दिले. मात्र त्यानंतर पुढल्या एका कीर्तनात मात्र मुलीच्या कपड्यावरून कमेंट करणाऱ्यांना त्यांनी थेट सुनावलं. साखरपुड्यासाठी केलेल्या अमाप खर्चामुळे टीका होत असतानाचा इंदुरीकर महाराज यांनी लोकांना थेट चॅलेंज दिलं. आता मी लग्न यापेक्षा मोठं, टोलेंजग करून दाखवेन, काय करायचं ते करा असं म्हणत त्यांनी सर्वांनाच आव्हान दिलं.
इंदुरीकर महाराज यांच्या पत्नीने घेतला खास उखाणा
या सर्व टीका, ट्रोलिंगच्या दरम्यानच इंदुरीकर महाराज यांच्या लेकीच्या साखरपुड्याचे काही फोटो, व्हिडीओ अजूहनही समोर येत असून ते व्हायरलही होत आहेत. याच दरम्यान ज्ञानेश्वरीच्या साखरपुड्यादरम्यान झालेला एका छान क्षणही समोर आला आहे. तो म्हणजे ज्ञानेश्वरी हिच्या साखरपुड्यादरम्यान तिची आई, म्हणजेच इंदुरीकर महाराज यांच्या पत्नीने घेतलेला छान उखाणा. सुंदर अशी हिरवी निळी साडी, मंगळसूत्र, हातात बांगड्या, चेहऱ्यावर हास्य, अशा उभ्या असलेल्या त्यांच्या शेजारीच उजवीकडे त्यांची भावी विहीणबाई, तर डावीकडे इंदुरीकर महाराज हे स्वत: उभे असल्याचे दिसत आहेत. यावेळी त्यांनी सुहास्य वदनाने उखाणा घेत सर्वांचं मन जिंकून घेतलं. ” जे मृदुंग वाजे, मृदुंग वाजे वीणा, निवृत्तीनाथांचं नाव घेते रामकृष्ण हरी म्हणा…” असा सुंदर उखाणा त्यांनी घेतल्यावर सर्वांच्या चेहऱ्यावर हसू फुललं आणि टाळ्यांचाही कडकडाट झाला.
इंदुरीकर महाराजांच्या विहीणबाईंनी घेतला उखाणा
तसेच इंदुरीकर महाराज यांच्या भावी विहीणबाई, म्हणजे ज्ञानेश्वरी हिच्या होणाऱ्या सासूबाई यांनी घेतलेल्या उखाण्याचाही व्हिडीओ समोर आला आहे. निळी साडी, गुलाबी काठ, नाकात नथ, चेहऱ्यावरचं हसू, अशा पेहेरावात असलेल्या त्यांनी सुंदर उखाणा घेतला. ” ताई आणि महाराज (इंदुरीकर महारा) खूप हौशी, सुनीलरावांचं नाव घेते, ज्ञानेश्वरी आणि साहिलच्या साखपुड्याच्या दिवशी” असा त्यांचा उखाणा ऐकताच सर्वांनी वा, वा म्हणत टाळ्यांचा गजर केला.