चीनची गुंतवणूक महाराष्ट्रात यायला हवी: देवेंद्र फडणवीस

| Updated on: Dec 23, 2020 | 4:12 PM

मुख्यमंत्रीपदी कायम राहण्याबाबत उद्धव ठाकरे हे आशावादी आहेत. आनंद आहे. पुढचे 50 वर्षे मुख्यमंत्री राहण्यासाठी त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत, असा चिमटा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढला. (Investment in Maharashtra should come from China says devendra fadnavis)

चीनची गुंतवणूक महाराष्ट्रात यायला हवी: देवेंद्र फडणवीस
Follow us on

नागपूर: महाराष्ट्र गुंतवणूक येत आहे. याचा आम्हाला आनंद आहे. यातील काही प्रकल्प हे आमच्या काळातील आहेत. चीनमधील गुंतवणूक आता भारतात येत आहे. त्यामुळे ही गुंतवणूक महाराष्ट्रातही यायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. (Investment in Maharashtra should come from China says devendra fadnavis)

देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्ते केली. महाराष्ट्र गुंतवणूक येत आहे. याचा आम्हाला आनंद आहे. यातील काही प्रकल्प हे आमच्या काळातील आहेत. चीनमधील गुंतवणूक आता भारतात येत आहे. त्यामुळे ही गुंतवणूक महाराष्ट्रातही यायला पाहिजे, असं सांगतानाच विदेशातील गुंतवणुकीत गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे. कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. आधी महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक होत होती. महाराष्ट्र या गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर होता. आता तिसऱ्या क्रमांकावर आहे, असं फडणवीस म्हणाले.

पुढची पंचवीस वर्षे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री राहायचे आहे. तसं विधानही त्यांनी केलं आहे. मुख्यमंत्री आशावादी आहेत याचाच आनंदन आहे. त्यांना पुढचे 50 वर्षे मुख्यमंत्री राहण्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. राऊतांच्या विधानावर मी बोलत नाही, असं ते म्हणाले.

जैतापूरच्या निर्णयाबद्दल आनंदच आहे

जैतापूरमध्ये मोबदला मिळाल्याने प्रकल्प होऊ शकतो असं शिवसेनेने सांगितलं आहे. त्यामुळे शिवसेनेची भूमिका बदल असल्याचा आनंदच आहे. मात्र हा मोबदला नक्की कुणाला मिळाला हे पाहावे लागेल, असं सांगतानाच आता नाणारबाबतही शिवेसनेने अशीच भूमिका घ्यावी. तिथल्या लोकांनी सुद्धा प्रकल्पासाठी जमीन दिली आहे, असंही त्यांनी निदर्शनास आणून दिलं.

बच्चू कडूंची लुडबुड

यावेळी त्यांनी राज्य मंत्री बच्चू कडू यांच्यावरही टीका केली. बच्चू कडू यांना नागपूरमध्ये रोखून ठेवण्यात आलं होतं. आता बच्चू कडूंची काय लुडबुड चालली आहे हे मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट करावं, असा टोलाही त्यांनी लगावला. (Investment in Maharashtra should come from China says devendra fadnavis)

 

संबंधित बातम्या:

2050 मध्येही मुख्यमंत्री म्हणून उद्घाटनाला येईन: उद्धव ठाकरे

 उलटी गंगा वाहण्यास सुरुवात, नगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

(Investment in Maharashtra should come from China says devendra fadnavis)