
राष्ट्रीय स्वयं संघाच्या कार्यक्रमात सलमान खान यांच्यासह अनेक बॉलीवूडच्या हस्तींनी सहभाग घेतला होता. आता सलमान खान याने संघाच्या कार्यक्रमात गेल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह अनेकांनी सवाल केले होते. त्यावरुन आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खान भारतीय नागरिक नाही का ? असा सवाल करीत यात सलमान खान हा आरएसएसच्या कार्यक्रमाला आला तर यात राजकारण करु नये असा सल्ला दिला आहे.
आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात बॉलीवूड क्षेत्रातील अनेक नामीगिरामी हस्ती उपस्थित राहिल्या होत्या, त्यात बॉलीवूड अभिनेता सलमान खान हा देखील उपस्थित होता. त्यावरुन आता राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली होती. आता येथून पुढे सर्वच मुसलमानांना संघाच्या कार्यक्रमात खुले आमंत्रण असणार आहे का ? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
आरएसए संस्थेला 100 वर्षे झाली आहेत. देशभक्त राष्ट्रभक्त म्हणून अनेक वर्षे आपण आरएसएसला पाहात आहोत. कट्टर देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती देशांनी पहिली आहे. जेव्हा संकट येतं, आपत्ती येते, तेव्हा आरएसएसचे स्वयंसेवक स्वतः घटनास्थळी जाऊन मदत करतात. सलमान खान याने आएसएसच्या कार्यक्रमात येणं काही चुकीचं नाही असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले.