AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat: तुरुंगातही अशोक खरातची कमाई सुरुच, त्या एका गुंतवणुकीमुळे मिळणार कोट्यवधी रुपये

अशोक खरात हा भोंदूबाबा सध्या तुरुंगात आहे. त्याची कसून चौकशी सुरु आहे. त्याच्या अनेक मालमत्तांवर कठोर कारवाई करण्यात आली. आता अशोक खरात तुरुंगात असूनही चांगली कमाई करत असल्याचे समोर आले आहे. त्याची ही कमाई नेमकी कुठून होते चला जाणून घेऊया...

Ashok Kharat: तुरुंगातही अशोक खरातची कमाई सुरुच, त्या एका गुंतवणुकीमुळे मिळणार कोट्यवधी रुपये
अशोक खरातImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 16, 2026 | 12:45 PM
Share

दैवी शक्तीच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणारा आणि अनेक शेतकऱ्यांची फसवणूक करणारा भोंदूबाबा अशोक खरात हा सध्या तुरुंगात आहे. सध्या अशोक खरातची कठोर चौकशी सुरु असून तो अंमलबजावणी संचालनालयाच्या रडावर असल्याचे दिसत आहे. दरम्यान, अशोक खरातबाबात एक मोठी अपडेट समोर आली आहे. तुरुंगातही अशोक खरातची चांगलीच कमाई होत असल्याचे दिसत आहे. आता ही कमाई नेमकी कशी झाली आहे जाणून घेऊया…

सध्या कारागृहात असलेल्या अशोक खरातची कमाई तुरुंगात असूनही सुरूच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नाशिक शहराच्या प्रस्तावित रिंग रोड प्रकल्पासाठी होत असलेल्या भूसंपादनामुळे खरात कुटुंबियांच्या पदरात सुमारे तीन कोटी रुपयांचे माप पडणार आहे.

वाचा: माणसाचे मांस खाणारी जगातील एकमेव डाळ माहितीये का? आपल्या रोजच्या जेवणात आहे समावेश

खरात कुटुंबियांना मिळणारी नुकसानभरपाई

मिळालेल्या माहितीनुसार, रिंग रोडच्या भूसंपादनात खरात यांच्या मालकीच्या विविध ठिकाणच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत. त्याचे वाटप खालीलप्रमाणे होण्याची शक्यता आहे:

गवळणे परिसर: या भागात अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरातच्या नावावर असलेल्या जमिनीच्या बदल्यात त्यांना ८२ लाख ८३ हजार रुपये मिळणार आहेत.

पाथर्डी परिसर: पाथर्डी शिवारात असलेल्या जमिनीपोटी अशोक खरातची कन्या तृप्तवाला खरात आणि सृष्टी खरात यांना तब्बल १ कोटी ८२ लाख रुपये मिळण्याचे निश्चित झाले आहे.

एकूणच या प्रकल्पातून खरात कुटुंबाला सुमारे तीन कोटींच्या आसपास रक्कम मिळणार असल्याने शहरात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

निलंबित अधिकाऱ्याच्या पत्नीचाही समावेश

केवळ खरातच नव्हे, तर या भूसंपादन प्रक्रियेत निलंबित उपजिल्हाधिकारी भांडे पाटील यांच्या पत्नीचे नावही समोर आले आहे. रिंग रोडच्या भूसंपादनात त्यांच्या पत्नीलाही लाखो रुपयांची नुकसानभरपाई मिळणार आहे. एका निलंबित महसूल अधिकाऱ्याच्या नातेवाईकाला मिळणाऱ्या या मोठ्या रकमेमुळे प्रशासकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत.

तांत्रिक अडचणी आणि उपस्थितीचा पेच

भूसंपादनाची ही प्रक्रिया सोपी असली, तरी काही तांत्रिक बाबींमुळे खरातच्या अडचणी वाढू शकतात:

१. दरामध्ये कपात होण्याची शक्यता: अशोक खरात सध्या कारागृहात आहे. खरेदी-विक्रीच्या प्रत्यक्ष प्रक्रियेत तो स्वतः उपस्थित राहू शकत नसल्यामुळे, नियमानुसार किंवा संमतीअभावी जमिनीचे दर कमी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

२. मुलींची उपस्थिती अनिवार्य: पाथर्डी परिसरातील भूसंपादनाचा पूर्ण मोबदला मिळवण्यासाठी खरातच्या दोन्ही मुलींना (तृप्तवाला आणि सृष्टी) प्रत्यक्ष हजर राहणे आवश्यक आहे. त्या उपस्थित न राहिल्यास ही प्रक्रिया लांबणीवर पडू शकते.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?