Jain Community Support Raj Thackeray : जैन समाजाचा राज ठाकरेंना पाठिंबा, मतभेद बाजूला ठेऊन जैन धर्मगुरू निलेश चंद्र मुनी यांची मोठी घोषणा

Jain Community Support Raj Thackeray : "कबुतरं मारण्याचं काम मंगल प्रभात लोढाने केलं. आपल्या स्वार्थासाठी ही लोकं मूक प्राण्यांची हत्या करत आहेत. साहेब तुमची भूमिका ठाम आहे. गरज पडली तर मी पण या आंदोलनात येईन"

Jain Community Support Raj Thackeray : जैन समाजाचा राज ठाकरेंना पाठिंबा,  मतभेद बाजूला ठेऊन जैन धर्मगुरू निलेश चंद्र मुनी यांची मोठी घोषणा
Muni Nileshchandra-Raj Thackeray
| Updated on: Oct 27, 2026 | 12:55 PM

जैन धर्मगुरू निलेश चंद्र मुनी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं समर्थन केलं आहे. कबूतरांवरून मनसे आणि निलेशचंद्र मुनी यांच्यात मतभेद झाले होते. पण आता वृक्षतोडीच्या विरोधातील मुद्द्यावर त्यांच्यात एकमत झालं आहे. कर्जत भीमाशंकर जंगलातील वृक्षतोडीच्या विरोधात राज ठाकरेंनी भूमिका घेतली आहे. त्या भूमिकेला जैन समाजाच्या पाठींब्याची घोषणा करण्यात आली आहे. “भीमाशंकरचं जंगल तोडत आहेत. भीमाशंकर जगंल तोडल्यानंतर विकासाच्या नावाखाली मूक, अबोल प्राण्यांची हत्या ही कंपनी करत आहे. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सह्याद्रीमध्ये झाडांची कत्तल होत आहे. झाडांची कत्तल झाल्यावर प्राण्यांची हत्या होत आहे. भगवान महावीरांचा संदेश आहे की, जिओ और जीने दो. जे जीवदया प्रेमी लोक आहेत, माझ्या जैन समाजाचे लोक आहेत. भीमा शंकरच जंगल नष्ट होत चाललं आहे. सह्याद्री वाचवण्याचा प्रयत्न तुम्ही करताय” असं निलेशचंद्र मुनी म्हणाले.

“लोक मला म्हणतात पर्यावरणाचं संरक्षण करणं प्रत्येक व्यक्तीचं काम आहे. जंगल तुटलं तर वन्यजीव कुठे जाणार. प्रत्येक वन्य जीवाची हत्या होत आहे. मुंबईत कबूतरांची सुद्धा हत्या या सरकारने केली. राज ठाकरे साहेबांनी ठाम भूमिका घेतली आहे. मी राजसाहेबांना निवेदन करतो की, सह्याद्री वाचवा. मी अदानी, लोढाचा समर्थक नाही. आमचे विचार भगवान महावीराचे विचार आहेत. जिओ और जीने दो” असं निलेशचंद्र मुनी यांनी सांगितलं.

Loading...

तुम्ही योग्य भूमिका घेतली

“राजसाहेबांना माझं समर्थन आहे. तुम्ही योग्य भूमिका घेतली आहे. आपले विचार पटत नसतील हा वेगळा विषय आहे. तुम्ही मूक प्राणी वाचवण्याची भूमिका घेतली आहे. जैन समाजाचा पाठिंबा आहे. कबुतरं मारण्याचं काम मंगल प्रभात लोढाने केलं. आपल्या स्वार्थासाठी ही लोकं मूक प्राण्यांची हत्या करत आहेत. साहेब तुमची भूमिका ठाम आहे. गरज पडली तर मी पण या आंदोलनात येईन. सह्याद्री वाचवा. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. दुष्काळ पडतोय, पाणी नाही. पशू, पक्षी मरत आहेत. ही हत्या आहे. महाराष्ट्र वाचवा, सह्याद्री वाचवा” असं निलेशचंद्र मुनी म्हणाले.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us