मोठा राडा! RSS च्या पथसंचलनावर थेट हल्ला, वातावरण तापलं
जळगावच्या किनगावात आरएसएसच्या पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस झालाय. या घटनेने किनगावात खळबळ उडालीये.

जळगावमध्ये मोठा राडा झाला आहे. जळगावच्या किनगावात आरएसएसच्या पथसंचलनावर दगडफेकीचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने किनगावात खलबळ उडाली आहे. या दगडफेकीच्या प्रयत्नानंतर रस्त्यावर एकच गर्दी झाली. दगडफेकीमुळे परिसरात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली. काहींनी एकच धावाधाव केली. पोलीसही मोठ्या संख्येने उपस्थित झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या यावल तालुक्यातील किनगावात आरएसएसकडून पथसंचलन सुरू होतं. पथसंचलन सुरू असतानाच दगडफेकीचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या घटनेने किनगावात गोंधळ निर्माण झाला. आरएसएसच्या रॅलीला एका गटाने विरोध होता. त्यानंतर हा गोंधळ झाल्याचे सांगण्यात आले. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देथील पथसंचलन सुरू होते. सौम्य लाठीचार्ज सुरू केल्यानंतर पोलिसांनी नागरिकांना अनेक सूचना देखील केल्या. कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
जळगावमध्ये नेमकं काय घडलं?
जळगावच्या किनगावात दसऱ्याच्या निमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नीतीने किनगाव शहरातून पथासंचलन रॅली काढण्याचे तयारी सुरू केली. त्यानंतर शहरातून जात असलेल्या रॅलीला एका गटाकडून विरोध केल्यावरून तणाव निर्माण झाला होता. यावेळी दगडफेक सुरू होताच पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करण्यात आला. या ठिकाणी एका धार्मिक स्थळाच्या समोरून जाणाऱ्या राहणाऱ्या एका गटाकडून विरोध दर्शवत या ठिकाणी महिलांनी ठिय्या मांडला होता. यावेळी परिस्थिती पाहून जळगाव जिल्ह्यातील पोलिसांनी तात्काळ या ठिकाणी जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या ठिकाणी असलेल्या तणावामध्ये तुरळक प्रमाणावर दगडफेक करण्याला सुरुवात झाली आणि त्यानंतरच परिस्थिती बघून पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज करण्यात आला. जमाव पांगल्यानंतर पथसंचलन पोलिस बंदोबस्तमध्ये सुरळीत पार पडले. सध्या किनगाव परिसरात तणाव पूर्ण शांतता आहे. या ठिकाणी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित विभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्यासह भुसावळ यावल रावेर येथील फौज फाटा या ठिकाणी दाखल झालेला आहे.