कोरोनाग्रस्त नातेवाईकांच्या भोजनाची गैरसोय, सोन्याची अंगठी विकून मोफत डब्याची सोय

अनेक नातेवाईक हे रात्रंदिवस रुग्णालयात थांबत असल्याने त्यांचे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होत आहे. (Jalgaon Meal arrangements for corona patient relatives)

कोरोनाग्रस्त नातेवाईकांच्या भोजनाची गैरसोय, सोन्याची अंगठी विकून मोफत डब्याची सोय
कोरोनाग्रस्त नातेवाईकांच्या भोजनाची गैरसोय, सोन्याची अंगठी विकून मोफत डब्याची सोय
| Updated on: May 25, 2021 | 8:33 AM

जळगाव : राज्यात एकीकडे कोरोना रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोना रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या प्रमाणात हाल सहन करावे लागत आहे. अनेक नातेवाईक हे रात्रंदिवस रुग्णालयात थांबत असल्याने त्यांचे खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होत आहे. याच पार्श्वभूमीवर एका सामाजिक प्रतिष्ठानने या रुग्णांच्या नातेवाईकांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे यासाठी युवाशक्ती प्रतिष्ठानचे पंकज कोळी घरातील सोनंही मोडलं आहे. (Jalgaon Muktainagar Yuvashakti Pratishthan Meal arrangements for corona patient relatives)

जळगावातील मुक्ताईनगर या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच त्यांच्यासोबत रुग्णालयात असणाऱ्या नातेवाईकांच्या भोजनाची गैरसोय होत आहे.

ही गैरसोय टाळण्यासाठी युवाशक्ती प्रतिष्ठानचे पंकज कोळी यांनी स्वतःची आठ ग्रॅम सोन्याची अंगठी मोडली. त्यानंतर त्यांनी गरजू लोकांसाठी विनामूल्य जेवणाचा डबा पोहोचवण्याचा एक अनोखा उपक्रम सुरू केला.

सध्या युवाशक्ती प्रतिष्ठान टीमच्या माध्यमातून दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना मोफत जेवणाचे डबे पुरवले जात आहे. त्यांच्या या कार्यात इतर सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत मदत केली आहे. त्यामुळे सध्या या प्रतिष्ठानचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या कार्यामुळे काही प्रमाणात का होईना रुग्णांना अन्न रुपी मोठी समृद्धी लाभत आहे.

(Jalgaon Muktainagar Yuvashakti Pratishthan Meal arrangements for corona patient relatives)

संबंधित बातम्या : 

Video : अखेर नागपूरच्या ‘त्या’ पोलिसावर कारवाई, महिलेची भाजी रस्त्यावर फेकणं महागात

कोरोना चाचणीसाठी आता थुंकीचे नमुने, नागपूरच्या ‘NEERI’चं संशोधन, वेळ आणि खर्चाची बचत

कोरोनाग्रस्त मृतदेहाच्या खिशातून मोबाईल-दागिने चोरी, बॉडी रॅप करणाऱ्या कर्मचाऱ्यांचीच हातचलाखी