‘गरीब की बीबी सबकी भाभी’ नगरसेवकाच्या वक्तव्यानं महापालिका हादरली, भाजप-ठाकरेसेनेत मोठा राडा!

जळगाव महापालिकेच्या महासभेत नगरसेवक इब्राहिम पटेल यांच्या वक्तव्याने सभागृहात वादाची ठिणगी पडली. भाजप आणि ठाकरे गटाचे नगरसेवक आमनेसामने आले. पाहा नेमकं काय घडलं?

गरीब की बीबी सबकी भाभी नगरसेवकाच्या वक्तव्यानं महापालिका हादरली, भाजप-ठाकरेसेनेत मोठा राडा!
Jalgaon News, Maharashtra Politics
Image Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 22, 2026 | 3:20 PM

किशोर पाटील, जळगाव, टीव्ही९ मराठी प्रतिनिधी: जळगाव महापालिकेच्या विशेष महासभेत आज जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. महापालिकेच्या मूळ आणि वाढीव हद्दीच्या सुधारित प्रारूप विकास आराखड्याला प्रसिद्धी देण्याच्या विषयावर चर्चा सुरू असतानाच सभागृहात वादाची ठिणगी पडली. शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक इब्राहिम पटेल यांनी महिलांबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले.

इब्राहिम पटेल यांनी ‘गरीब की बीबी सबकी भाभी’ असे वक्तव्य केल्याने भाजप आणि ठाकरे गटाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. यावेळी भाजपचे नगरसेवक विजय बांदल, इब्राहिम पटेल आणि शरद तायडे यांच्यात वाद झाला. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने सभागृहात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Loading...

दरम्यान, महापौर आणि उपमहापौरांनी मध्यस्थी करत हा वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सभागृहात विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी केला. सभागृहात आमचे म्हणणे ऐकून घेतले जात नसेल, तर येथे येऊन काय फायदा, असा सवाल करत इब्राहिम पटेल यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

अखेर या प्रकारामुळे संतप्त झालेल्या इब्राहिम पटेल यांच्यासह शिवसेना ठाकरे गटाच्या सर्व नगरसेवकांनी सभागृहातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. विरोधकांचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप करत त्यांनी महासभेतून सभात्याग केला.

महापालिका कार्यालयातही वादाची ठिणगी

महासभेत झालेला हा वाद केवळ सभागृहापुरता मर्यादित राहिला नाही. सभागृहातून बाहेर पडल्यानंतर महापालिकेच्या कार्यालयातही भाजप आणि ठाकरे गटाच्या नगरसेवकांमध्ये पुन्हा शाब्दिक खडाजंगी झाली. भाजपचे नगरसेवक विजय बांदल आणि ठाकरे गटाच्या नगरसेवकांमध्ये जोरदार वादावादी झाल्याने कार्यालयातील वातावरणही तापले. त्यामुळे विकास आराखड्याच्या चर्चेसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष महासभेची चर्चा राजकीय वाद आणि नगरसेवकांमधील संघर्षामुळे अधिक रंगली.

जामनेरला बोदवड रस्त्यावरील दुकानाला भीषण आग

भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली अग्निशामक विभाग आग नियंत्रणात आणले मात्र दुकाना जळून खाक झाल्या. जामनेर येथील बोदवड रोडवरील कांग नदीच्या पुलाजवळ भंगाराच्या गुदामाला वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत प्लॉस्टीकने पेट घेतल्यानंतर रस्त्यावरील ६ दुकाने जळुन खाक झाली. नगरपालीकेच्या बंब व स्थानिक नागरीकांनी आग विझवीली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us