AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मार्लेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात कोसळले दगड; डोंगराच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

आठवडाभरात दोन दुर्घटना घडल्या असून चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्यानंतर आता थेट मंदिरातच दगड कोसळले, IIT मुंबईच्या तज्ज्ञांच्या पाहणीदरम्यान ही घटना घडली.

मार्लेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात कोसळले दगड; डोंगराच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
| Updated on: Nov 22, 2026 | 3:07 PM
Share

संगमेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र मार्लेश्वर येथील डोंगराच्या सुरक्षिततेचा प्रश्न आता अधिक गंभीर बनला आहे. आठवडाभरापूर्वी डोंगरावरून कोसळलेल्या दगडांमुळे चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेची चर्चा आणि ग्रामस्थांचा संताप कायम असतानाच आता थेट मार्लेश्वर मंदिराच्या गुहेतील गाभाऱ्यातच छोटे दगड कोसळल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, IIT मुंबईचे तज्ज्ञ मंदिर परिसराची सुरक्षितता तपासत असतानाच हा प्रकार घडला. सुदैवाने त्यावेळी भाविकांची गर्दी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या सलग घटनांमुळे भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शुक्रवारी दुपारी सुमारे एकच्या सुमारास मार्लेश्वर मंदिराच्या गुहेतील गाभाऱ्यात अचानक छोटे दगड कोसळले. त्यावेळी IIT मुंबईचे तज्ज्ञ मंदिराच्या सुरक्षिततेची पाहणी करत होते. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ दर्शन थांबवण्यात आले. त्यानंतर तज्ज्ञांनी गाभाऱ्यात जाऊन पुन्हा पाहणी केली. परिस्थितीची खातरजमा केल्यानंतर भाविकांसाठी दर्शन पुन्हा सुरू करण्यात आले.

दरम्यान, गेल्याच आठवड्यात मंदिराजवळील दत्त मंदिरासमोरील धबधब्याकडे जाणाऱ्या मार्गावर डोंगरावरून मोठे दगड कोसळले होते. या दुर्घटनेत ईश्वरपूर येथील चार वर्षीय रुत्वी संदीप पाटील हिचा मृत्यू झाला होता, तर तिचे वडील आणि चुलते जखमी झाले होते. या घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव यांच्याकडे केली होती.

मार्लेश्वर परिसरात सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामासाठी करण्यात येणाऱ्या सुरुंग स्फोटांमुळे डोंगरावरील दगड ढिले होत असून, त्यातूनच अशा दुर्घटना घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यासंदर्भात वारंवार सूचना देऊनही आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा दावाही त्यांनी केला. यापूर्वीच प्रशासनाला निवेदने देऊन धोक्याची जाणीव करून दिली होती. मात्र, वेळीच दखल घेतली असती, तर निष्पाप चिमुकलीचा जीव वाचला असता, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

आठवडाभरात घडलेल्या दोन घटनांनी मार्लेश्वर परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न अधिकच गंभीर केला आहे. एका घटनेत चिमुकलीचा बळी गेला, तर दुसऱ्या घटनेत थेट मंदिराच्या गाभाऱ्यात दगड कोसळले. त्यामुळे केवळ भाविकांच्या दर्शनापुरताच नव्हे, तर संपूर्ण डोंगर परिसराच्या सुरक्षिततेचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

पुलाच्या कामासाठी होणाऱ्या सुरुंग स्फोटांचा आणि डोंगरावरून दगड कोसळण्याच्या घटनांचा परस्पर संबंध आहे का? IIT मुंबईच्या तज्ज्ञांच्या पाहणीतून नेमके काय निष्पन्न होणार? ग्रामस्थांनी केलेल्या आरोपांची प्रशासन चौकशी करणार का? तसेच भाविक आणि स्थानिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कधी केल्या जाणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जानेवारी २०२७ मध्ये होणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नांची उत्तरे शोधून प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

Follow Us
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!
दुष्काळाचा मोठा फटका! धाराशिवमध्ये 600 एकरांवरील तुतीच्या बागा...
दुष्काळाचा मोठा फटका! धाराशिवमध्ये 600 एकरांवरील तुतीच्या बागा सुकल्या, रेशीम उत्पादक संकटात
राजकारणात येण्याची इच्छा नव्हती, पण लीडर बनायचं होतं; पंकजा मुंडेंनी..
राजकारणात येण्याची इच्छा नव्हती, पण लीडर बनायचं होतं; पंकजा मुंडेंनी सांगितली मनातील गोष्ट
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही..
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही संकटात; शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन..
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन 3450 रुपये दर
संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदार..
संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदारांचा हिशोब द्या! नंतर...
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी...
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय वाद! अमित देशमुखांच्या आरोपांना...
लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय वाद! अमित देशमुखांच्या आरोपांना संभाजी पाटील निलंगेकरांचे जोरदार प्रत्युत्तर
अमित शहांचा गेल्या दोन महिन्यात 7 वेळा महाराष्ट्र दौरा; म्हणजे...
संजय राऊतांचा खळबळजनक दावा! अमित शहांचा गेल्या दोन महिन्यात 7 वेळा महाराष्ट्र दौरा; म्हणजे...