AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kolhapur Politics: कोल्हापुरात महापौर बदलाच्या हालचाली, महायुतीत रस्सीखेच, पडद्यामागे काय घडतंय?

भाजपाच्या विद्यमान महापौर रुपरानी निकम यांनी आपल्याला वरिष्ठांनी सव्वा वर्ष कालावधी दिल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे महायुतीमधील पक्षाला दहा महिन्याचा कालावधी दिला गेल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. 

Kolhapur Politics: कोल्हापुरात महापौर बदलाच्या हालचाली, महायुतीत रस्सीखेच, पडद्यामागे काय घडतंय?
| Updated on: Nov 22, 2026 | 3:05 PM
Share

 भूषण पाटील प्रतिनिधी: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत अभूतपुर्व अशा नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या अन् कोल्हापुरमध्ये राजकारण चांगलेच रंगले. गोकुळच्या निवडणुकीत महायुतीने एकत्रपणे लढा देत बहुमत असूनही काँग्रेस नेते सतेज पाटील यांना सत्तेपासून दूर ठेवले. गोकुळनंतर आता महापौरपदावरुन कोल्हापुरमध्ये राजकारण तापणार आहे. मात्र यावेळी महायुतीमध्येच जोरदार जुंपणार असल्याचं दिसत आहे.

कोल्हापुरमध्ये महापौर बदलाच्या चर्चा!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोल्हापुर महानगरपालिकेमध्ये महापौर बदलाच्या चर्चा रंगल्या आहेत. महापौर पदावरुन भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच पाहायला मिळत आहे. भाजपाच्या विद्यमान महापौर रुपरानी निकम यांनी आपल्याला वरिष्ठांनी सव्वा वर्ष कालावधी दिल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे महायुतीमधील पक्षाला दहा महिन्याचा कालावधी दिला गेल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

राष्ट्रवादीने केला दावा! 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आदिल फरास यांनी महापौर पदावर दावा केला आहे. मात्र आपण वरिष्ठांच्या आदेशानंतरच राजीनामा देणार असल्याचे विद्यमान महापौर रुपाराणी निकम यांनी स्पष्ट केले आहे तसेच महापौरपदाचा किमान सव्वा वर्षाचा कालावधी मिळायला हवा अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आता महापौरपदावरुन महायुतीमध्ये जोरदार जुंपणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे 26, शिवसेना शिंदे गटाचे 14 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 नगरसेवक निवडून आले होते. या निवडणुकीत महायुतीने सत्ता मिळवली असली तरी सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. कोल्हापुरात काँग्रेसने स्वबळावर लढवत 34 जागा मिळवल्या होत्या तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अवघी एक जागा मिळाली होती.

सतेज पाटील यांचा करिश्मा! 

दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतही काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या एकाकी लढ्याची चर्चा झाली होती. सतेज पाटील यांनी एकट्याने निवडणूक लढवत काँग्रेसला मोठे यश मिळवून दिले होते. सतेज पाटील यांचे मायक्रो प्लॅनिंग, जोरदार प्रचार अन् कोल्हापुरकर कसं तुम्ही म्हणालं तसं अशी टॅगलाईन घेत विरोधकांना दिलेला शह यामुळे ही निवडणूक गाजली होती. मात्र काँग्रेसला पालिकेवर सत्ता मिळवण्यात अपयश आले.

Follow Us
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!
दुष्काळाचा मोठा फटका! धाराशिवमध्ये 600 एकरांवरील तुतीच्या बागा...
दुष्काळाचा मोठा फटका! धाराशिवमध्ये 600 एकरांवरील तुतीच्या बागा सुकल्या, रेशीम उत्पादक संकटात
राजकारणात येण्याची इच्छा नव्हती, पण लीडर बनायचं होतं; पंकजा मुंडेंनी..
राजकारणात येण्याची इच्छा नव्हती, पण लीडर बनायचं होतं; पंकजा मुंडेंनी सांगितली मनातील गोष्ट
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही..
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही संकटात; शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन..
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन 3450 रुपये दर
संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदार..
संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदारांचा हिशोब द्या! नंतर...
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी...
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय वाद! अमित देशमुखांच्या आरोपांना...
लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय वाद! अमित देशमुखांच्या आरोपांना संभाजी पाटील निलंगेकरांचे जोरदार प्रत्युत्तर
अमित शहांचा गेल्या दोन महिन्यात 7 वेळा महाराष्ट्र दौरा; म्हणजे...
संजय राऊतांचा खळबळजनक दावा! अमित शहांचा गेल्या दोन महिन्यात 7 वेळा महाराष्ट्र दौरा; म्हणजे...