AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुस्तक फाडणं मान्य नाही, मी कधीही…; आशिष शेलार थेट बोलले

आशिष शेलार यांनी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात मोठं भाष्य केलं. त्यांनी पुस्तक फाडणे मान्य नसल्याचे म्हटलं. त्यांच्या वक्तव्याने चर्चाना उधाण आलं आहे.

पुस्तक फाडणं मान्य नाही, मी कधीही...; आशिष शेलार थेट बोलले
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Nov 22, 2026 | 3:00 PM
Share

शिंदे गटाच्या नेत्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचं पुस्तक फाडलं होतं. शिंदे गटाच्या नेत्याच्या पुस्तक फाडण्याच्या कृत्याची जोरदार चर्चा झाली. यावेळी शिंदे गटाच्या शायना एनसी यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांचाही फोटो फाडला गेला होता. त्यावरून एकच राजकारण तापलं होतं. या घटनेची चर्चा असताना भाजप आमदार आशिष शेलार यांनी पुस्तकावर मोठं भाष्य केलं आहे.  पुस्तक फाडणं मान्य नसल्याचे शेलार यांनी सांगितले.

एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात आशिष शेलार यांनी भाष्य  केलं. भाजप आमदार आशिष शेलार म्हणाले, ‘ पुस्तक, साहित्य निर्मिती लोकांना प्रगल्भच करते. केवळ सवय म्हणून नाही, लोकांना घडवायला पुस्तक महत्त्वाचं आहे.  पुस्तक फाडणं मला मान्य नाही. मी कधी पुस्तक फाडलं नाही. ना कधी पंतप्रधानांचा निर्णय फाडला’.  पुढे म्हणाले, ‘लोकशाही संसदसे नही सडकसे चलेगी. ही भाषा बोलली जाते. तेव्हा अशा पुस्तकाची गरज आहे. याचा अर्थ अराजकता असा आहे’.  कार्यक्रमातील भाषणानंतर आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांवर जोरदार टीका केली. डिलिमिटेशन विधेयकावर शेलार म्हणाले, लोकहिताची भूमिका सरकार घेत आहे’. तर राऊतांच्या आरोपांना उत्तर देण्याचे आशिष शेलार यांनी टाळले.

अजितदादा अपघात प्रकरणावर शेलार म्हणाले, ‘सगळ्या राजकीय पक्षांची चौकशीची मागणी आहे. सुनील तटकरेंनीही तेच मांडलं’. तर आनंदराज आंबेडकर वक्तव्यावर म्हणाले, ‘कुठल्याही पक्षाच्या दिवंगत नेत्याबाबत बोलताना काळजी असावी.  संयम बाळगला पाहिजे असं माझं मत आहे’. टिपू सूलतान प्रकरणावर म्हणाले, ‘संजय राऊतांची अफजलखानाच्या वधाबाबत काय भूमिका आहे. शिवरायांनी कोथळा बाहेर काढला होता, याबद्दल त्यांनी भूमिका स्पष्ट करावी’.

राजू शेट्टी पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात काय म्हणाले?

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, ‘अतिशय सुंदर पुस्तकाच प्रकाशन आज होत आहे. विजय चोरमारे यांनी निवडणुकांचा इतिहास मांडला आहे. आपल्या देशात मतदारांनी जर मनावर घेतलं तर कुणालाही निवडणून आणू शकतात. माझ्या वेळेस देखील लोकांनी १ १ रुपया गोळा करून मला निवडून आणलं. मी फाटका होतो, तरी मला निवडून आणलं. कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेने आमची निवडणूक हातात घेतली होती.  लोकांनी वर्गणी देऊन मला निवडून आणलं होतं. हा सगळा प्रभाव चळवळीचा आहे’.

Follow Us
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!
दुष्काळाचा मोठा फटका! धाराशिवमध्ये 600 एकरांवरील तुतीच्या बागा...
दुष्काळाचा मोठा फटका! धाराशिवमध्ये 600 एकरांवरील तुतीच्या बागा सुकल्या, रेशीम उत्पादक संकटात
राजकारणात येण्याची इच्छा नव्हती, पण लीडर बनायचं होतं; पंकजा मुंडेंनी..
राजकारणात येण्याची इच्छा नव्हती, पण लीडर बनायचं होतं; पंकजा मुंडेंनी सांगितली मनातील गोष्ट
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही..
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही संकटात; शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन..
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन 3450 रुपये दर
संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदार..
संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदारांचा हिशोब द्या! नंतर...
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी...
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय वाद! अमित देशमुखांच्या आरोपांना...
लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय वाद! अमित देशमुखांच्या आरोपांना संभाजी पाटील निलंगेकरांचे जोरदार प्रत्युत्तर
अमित शहांचा गेल्या दोन महिन्यात 7 वेळा महाराष्ट्र दौरा; म्हणजे...
संजय राऊतांचा खळबळजनक दावा! अमित शहांचा गेल्या दोन महिन्यात 7 वेळा महाराष्ट्र दौरा; म्हणजे...