AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वजन कमी करण्यासाठी अंडं खावं की पनीर? तज्ज्ञांचा काय सल्ला?

Health Tips Eggs or Panner: लठ्ठपणा कमी करण्यासाठी आणि फिट दिसण्यासाठी आता जागरूकता वाढली आहे. पण डाएट प्लॅनविषयी अजूनही अनेकांच्या मनात संभ्रम आहे. अंडे खावे की पनीर खावे, असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो.

वजन कमी करण्यासाठी अंडं खावं की पनीर? तज्ज्ञांचा काय सल्ला?
वजन कमी करण्यासाठी अंडं खावं की पनीर? तज्ज्ञांचा काय सल्ला?
| Updated on: Nov 22, 2026 | 2:44 PM
Share

Health Tips Eggs or Panner: हिवाळा आल्यावर मैदानं गजबजू लागतात. व्यायामशाळा, जीम, योगा क्लाससेला हटकून जाणाऱ्यांची संख्या वाढते. लठ्ठपणा कमी व्हावा आणि फिट दिसण्यासाठी अनेक जण जागरूक झाले आहेत. पण आहारात काय काय घ्यावे आणि काय खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहिल. आवश्यक ते पोषण मिळेल याविषयी अनेकांच्या मनात संभ्रम असतो. वजन कमी करण्यासाठी अंडे खावे की पनीर असा प्रश्न ही अनेकांच्या मनात येतो.

अंडे खाण्याचे फायदे

अंड्यात प्रथिनं असते. ते प्रथिनांचा उत्तम स्त्रोत मानले जाते. वजन कमी करण्यासाठी कॅलरी डेफिसिटला महत्त्व आहे. अंड्यात तुलनेने कमी कॅलरीजमद्ये चांगले प्रथिने आणि पोट भरल्याची जाणीव देणारे पदार्थ उपयुक्त ठरतात. उकडलेले अंडे अथवा कमी तेलात तयार केलेले अंड्याचे प्रकार दैनंदिन डाएटमध्ये समाविष्ट करता येतात. पण अंडे नाहक अति तेलात फ्राय करून खाल्ल्यास वजन नियंत्रित ठेवण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. तसेच अंड्यांसोबत अतिरिक्त कॅलरिज असलेले पदार्थ खाणे टाळणेही महत्त्वाचे ठरते.

पनीर अनेकांचा विक पाईंट, अनावश्यक खाणे टाळा

अनेकदा शाकाहारी लोक अंडे खात नाहीत. ते अंड्याला पर्याय शोधतात. पनीर हा प्रथिन, कॅल्शियम आणि इतर पोषक घटकांचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. पनीरमुळे ऊर्जा टिकून राहते. पण पनीरमध्ये फॅट आणि कॅलरीजचे प्रमाण तुलनेने अधिक असते. त्यामुळे पनीर खाताना जीभेवर ताबा ठेवणे अत्यावश्यक आहे. नाहीतर वजन कमी करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल आणि लठ्ठपणा वाढण्याची शक्यता आहे. पनीर अधिक तेलकट, तुपकट पद्धतीने न शिजवता तयार करणे फायद्याचे ठरेल.

मग काय खावे?

लठ्ठपणा कमी करणे ही काही एका पदार्थावर अवलंबून असलेली प्रक्रिया नाही. त्यासाठी रोजचा नियमित आणि योग्य आहार, नियमित व्यायाम, फायबरयुक्त भाजीपाला खाणे, शारीरिक हालचाल करणे आणि एक संतुलित जीवन जगणे आवश्यक आहे. त्यामुळे अंडे आणि पनीर योग्य प्रमाणात खाल्ल्यास पोट भरल्यासारखे वाटेल आणि वजनही नियंत्रणात राहिल. पण कोणत्याही पदार्थांचे अतिरेक टाळणे आवश्यक आहे.

डिस्क्लेमरः हा लेख केवळ माहितीसाठी देण्यात आला आहे. आरोग्यविषयक सल्ल्यासाठी अगोदर तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!
दुष्काळाचा मोठा फटका! धाराशिवमध्ये 600 एकरांवरील तुतीच्या बागा...
दुष्काळाचा मोठा फटका! धाराशिवमध्ये 600 एकरांवरील तुतीच्या बागा सुकल्या, रेशीम उत्पादक संकटात
राजकारणात येण्याची इच्छा नव्हती, पण लीडर बनायचं होतं; पंकजा मुंडेंनी..
राजकारणात येण्याची इच्छा नव्हती, पण लीडर बनायचं होतं; पंकजा मुंडेंनी सांगितली मनातील गोष्ट
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही..
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही संकटात; शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन..
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन 3450 रुपये दर
संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदार..
संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदारांचा हिशोब द्या! नंतर...
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी...
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय वाद! अमित देशमुखांच्या आरोपांना...
लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय वाद! अमित देशमुखांच्या आरोपांना संभाजी पाटील निलंगेकरांचे जोरदार प्रत्युत्तर
अमित शहांचा गेल्या दोन महिन्यात 7 वेळा महाराष्ट्र दौरा; म्हणजे...
संजय राऊतांचा खळबळजनक दावा! अमित शहांचा गेल्या दोन महिन्यात 7 वेळा महाराष्ट्र दौरा; म्हणजे...
मोठी बातमी! भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन; राजकीय...
मोठी बातमी! भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा