AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सीसीटीव्ही बाहेर काढला तर कळेल… दीपाली सय्यद यांचे गंभीर आरोप, एपस्टिन फाईल्सच्या प्रदर्शनावरुन थेटच बोलल्या

Dipali Sayyad, Maharashtra Epstein Files : 'महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स' चित्रपटाच्या प्रदर्शनावरून वाद सुरू आहे. अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना चित्रपटाला विरोध करणाऱ्यांवर निशाणा साधला. चित्रपटाला सेन्सॉर प्रमाणपत्र मिळाले नाही, तर बोर्डाच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

सीसीटीव्ही बाहेर काढला तर कळेल... दीपाली सय्यद यांचे गंभीर आरोप, एपस्टिन फाईल्सच्या प्रदर्शनावरुन थेटच बोलल्या
Dipali Sayyad, Maharashtra Epstein FilesImage Credit source: टीव्ही९ मराठी
| Updated on: Nov 22, 2026 | 2:43 PM
Share

गोविंद ठाकूर टीव्ही ९ मराठी प्रतिनिधी : ‘महाराष्ट्र एपस्टिन फाईल्स’ चित्रपटावरून सुरू असलेल्या वादावर अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चित्रपटाच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्याइतका काही मोठा वाद झालेला नाही. काही लोक हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये म्हणून असे प्रकार करत आहेत. पोस्टरवर जोडे मारले जात आहेत, त्यामुळे मला काही फरक पडत नाही, असं दीपाली सय्यद म्हणाल्या. काही लोक न्यायालयात गेले होते, मात्र मला स्टे मिळाला आहे. चित्रपटाच्या नावावरून जो विषय सुरू होता, त्यावर आता स्टे आला असल्याचंही त्यांनी सांगितलं. एक चित्रपट तयार करण्यासाठी प्रत्येकाचे कष्ट लागलेले असतात, असंही त्या म्हणाल्या.

चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळे

चित्रपट प्रदर्शित होण्याआधी दररोज काही ना काही घडत आहे. चित्रपटाचं स्क्रीनिंगही दोन दिवस पुढे ढकलण्यात आलं. हा चित्रपट 20 तारखेला प्रदर्शित होणार होता, मात्र त्यादिवशी प्रदर्शन होऊ शकलं नाही. त्यानंतर पुन्हा नवीन तारीख देण्यात आली आहे. उद्या स्क्रीनिंगची तारीख देण्यात आली आहे. मात्र, उद्या स्क्रीनिंग झालं नाही किंवा स्क्रीनिंग झाल्यानंतरही सेन्सॉर प्रमाणपत्र दिलं नाही, तर आम्ही सेन्सॉर बोर्डाच्या विरोधात त्यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करू, असा इशारा दीपाली सय्यद यांनी दिला.

सेन्सॉर बोर्डावर राजकीय दबाव

एखाद्या बलात्कारी माणसाला पाठिंबा देण्यापेक्षा त्याच्या विरोधात एखादा चित्रपट तयार होऊन तो बाजारात येत असेल, तर त्याला प्रदर्शित होऊ दिलं पाहिजे, असं दीपाली सय्यद म्हणाल्या. सेन्सॉर बोर्डावर राजकीय दबाव असल्याचा आरोपही त्यांनी केला. अनेक जण सेन्सॉर बोर्डात येऊन भेटून जातात. तसंच, सेन्सॉर बोर्डात एक महिला येते आणि सतत दबाव टाकते. सीसीटीव्ही कॅमेरा बाहेर काढला, तर ती महिला कोण आहे, हे समोर येईल, असं विधान त्यांनी केलं. सध्या जे काही सुरू आहे ते चुकीचं असून असं व्हायला नको, असंही त्या म्हणाल्या.

‘विनाकट चित्रपट प्रदर्शित करा’

सेन्सॉर बोर्डाकडे माझी एवढीच मागणी आहे की, हा चित्रपट कोणत्याही कटशिवाय प्रदर्शित व्हायला हवा, असं दीपाली सय्यद यांनी स्पष्ट केलं. यावेळी ट्रेडमार्कच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं. केवळ एका घड्याळामुळे आपण ट्रेडमार्क बदलू शकतो, असं काही नाही, असं त्या म्हणाल्या. तसंच, ट्रेडमार्क असलेली साडी आपल्याला आवडली असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!
दुष्काळाचा मोठा फटका! धाराशिवमध्ये 600 एकरांवरील तुतीच्या बागा...
दुष्काळाचा मोठा फटका! धाराशिवमध्ये 600 एकरांवरील तुतीच्या बागा सुकल्या, रेशीम उत्पादक संकटात
राजकारणात येण्याची इच्छा नव्हती, पण लीडर बनायचं होतं; पंकजा मुंडेंनी..
राजकारणात येण्याची इच्छा नव्हती, पण लीडर बनायचं होतं; पंकजा मुंडेंनी सांगितली मनातील गोष्ट
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही..
महाराष्ट्रात एल निनोचा कहर! मोसंबीच्या बागा जळाल्या, कापूस उत्पादकही संकटात; शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन..
मोठी बातमी! शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश, माढ्यात ऊसाला मिळणार प्रतिटन 3450 रुपये दर
संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदार..
संजय राऊतांवर सुनील तटकरेंचा हल्लाबोल; आधी स्वतःच्या पक्षातील खासदारांचा हिशोब द्या! नंतर...
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी...
मुंबईकरांसाठी मोठी खुशखबर! कोयनेतून मिळणार 67 टीएमसी अतिरिक्त पाणी, शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय वाद! अमित देशमुखांच्या आरोपांना...
लातूरच्या पाणीप्रश्नावरून राजकीय वाद! अमित देशमुखांच्या आरोपांना संभाजी पाटील निलंगेकरांचे जोरदार प्रत्युत्तर
अमित शहांचा गेल्या दोन महिन्यात 7 वेळा महाराष्ट्र दौरा; म्हणजे...
संजय राऊतांचा खळबळजनक दावा! अमित शहांचा गेल्या दोन महिन्यात 7 वेळा महाराष्ट्र दौरा; म्हणजे...
मोठी बातमी! भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन; राजकीय...
मोठी बातमी! भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा