90000000 रुपयांचे 5000000 रसगुल्ले, वऱ्हाडी मंडळीला आणण्यासाठी हेलिकॉप्टर,आमदाराच्या लेकीच्या लग्नात मोठा थाट, अनंत सिंह यांनी..
मोकामा बिहारचे आमदार अनंत सिंह यांच्या लेकीच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. कोट्यावधी रूपये खर्च या लग्नासाठी केला जात आहे. हेच नाही तर पाहुण्यांना ने आण करण्यासाठी चक्क हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली. 150 पदार्थ देखील पाहुण्यांच्या खाण्यासाठी ठेवण्यात आली.

मोकामा बिहारचे आमदार अनंत सिंह यांची मुलगी शिवांगी हिच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून या लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. चर्चा होण्यासारखेच हे लग्न आहे. भाई विषय फार जास्त तगडा आहे. चक्क पाहुण्यांना लग्नात सहभागी होण्यासाठी आणि त्यांना परत घरी सोडण्यासाठी वऱ्हाडी मंडळाकरिता थेट हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली. जेवढे पाहुणे मंडळी या लग्नात दाखल होणार आहेत, त्यासर्वांकरिता चक्क हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली. या लग्नाची तयारी अत्यंत भव्य स्वरूपात केली जात असून जेवणाचेही खास नियोजन करण्यात आले. पाहुण्यांचे जेवण, त्यांचे मनोरंजन आणि त्यांच्या खाण्यापिण्याचेही खास नियोजन करण्यात आले. अगदी छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्यात आले.
अनंत सिंह यांचे मूळ गाव असलेल्या नादावान (बारह) येथे हे शाही लग्न पार पडणार आहे. 25 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या विवाह सोहळ्याला सुमारे 4 लाख पाहुणे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या लग्नात 150 हून अधिक पदार्थांची चव पाहुण्यांना चाखता येणार आहे. हेच नाही तर काही पदार्थ तयार करण्यासही सुरूवात झाली. या लग्नातील सर्वात जास्त चर्चेत असलेली गोष्ट म्हणजे पाहुण्यांना दिले जाणारे 50 लाख रसगुल्ले. पाहुण्यांना वाढण्यासाठी तब्बल 50 लाख रसगुल्ले तयार केले जात आहेत.
रसगुल्ले तयार करण्याचे कामही सुरू करण्यात आले. लग्नातील पाहुण्यांसाठी 50 लाख रसगुल्ले तयार केले जात आहेत. बाजारभावानुसार, या रसगुल्ल्याची किंमत तब्बल 9 कोटी आहे. फक्त रस्सगुल्ल्यावर इतके पैसे उडवली जात आहेत. लग्नासाठी रसगुल्ले तयार करण्याचा प्रत्यक्ष खर्च यापेक्षा जास्त असू शकतो, असा अंदाज आहे.
पाहुण्यांच्या करमणुकीसाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात जिंकणाऱ्यांना गिफ्ट म्हणून थेट थार दिली जाणार आहे. या स्पर्धेसाठी विविध राज्यांतील घोडे आधीच नडावन येथे पोहोचले आहेत. ही शर्यत 25 नोव्हेंबर रोजी होणार असून विजयी स्पर्धकाला थार गाडी बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. या स्पर्धेसाठी एक स्वतंत्र मैदानही तयार करण्यात आले आहे. या लग्नाची देशभरात चर्चा सुरू आहे.
