Jalgaon Nagar Parishad Election Result : मतमोजणीपूर्वीच भाजपचे पारडे जड, पाहा कोणाचे किती नगरसेवक बिनविरोध?

जळगाव जिल्हा नगरपरिषद निवडणुकीत भाजपची मोठी मुसंडी मारली आहे, यात १८ पैकी ९ नगराध्यक्ष पदांवर भाजपचे वर्चस्व मिळण्याची शक्यता असून २५ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत.

Jalgaon Nagar Parishad Election Result : मतमोजणीपूर्वीच भाजपचे पारडे जड, पाहा कोणाचे किती नगरसेवक बिनविरोध?
bjp (1)
| Updated on: Dec 21, 2025 | 12:37 PM

जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. त्यातच आज जळगावातील १८ महत्त्वाच्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतमोजणी प्रक्रिया पार पडत आहे. मात्र, मतमोजणीपूर्वीच भाजपने जळगाव जिल्ह्यावर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. या निवडणुकीत मतदानापूर्वीच अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे स्पष्ट झाली आहेत. जळगाव जिल्ह्यात तब्बल २५ नगरसेवक आणि एका नगराध्यक्षाची बिनविरोध निवड झाली आहे. यामध्ये भाजपने मुसंडी मारल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

बिनविरोध निवडींमध्ये भाजपचे वर्चस्व

जळगाव जिल्ह्यात झालेल्या बिनविरोध निवडींमध्ये भाजपने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. एकूण २५ बिनविरोध नगरसेवकांपैकी सर्वाधिक नगरसेवक भाजपचे आहेत. यात भाजपचे १८ नगरसेवक, शिवसेना शिंदे गटाचे ३ नगरसेवक, काँग्रेस १ नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा १ नगरसेवक आणि इतर/अपक्ष: २ नगरसेवक यांची बिनविरोध निवड झाली आहे.

तर नगरपरिषद निहाय विचार केल्यास, जामनेर आणि भुसावळमध्ये भाजपला मोठे यश मिळाले आहे. जामनेरमध्ये भाजपचे ९ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. भुसावळमध्ये भाजपचे ४ नगरसेवक बिनविरोध ठरले आहेत. फैजपूरमध्ये भाजप ३, काँग्रेस १ आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) १ अशा एकूण ५ जागा बिनविरोध झाल्या आहेत.

अपक्षांचीही बाजी

त्यासोबतच सावदामध्ये शिवसेना शिंदे गटाचे २ आणि भाजपचा १ नगरसेवक बिनविरोध निवडून आला आहे. रावेर: भाजपचा १ नगरसेवक बिनविरोध निवडून आला आहे. एरंडोल शिवसेना शिंदे गटाचा १ नगरसेवक बिनविरोध निवडून आला आहे. तसेच शेंदुर्णी येथे एका अपक्ष उमेदवाराने बाजी मारली आहे. त्यासोबतच अमळनेर शहर विकास आघाडीचा १ नगरसेवक बिनविरोध निवडून आला आहे.

जळगाव जिल्ह्यातील १८ नगराध्यक्ष पदांसाठी मोठी चुरस असून संभाव्य कलानुसार भाजप ९, शिवसेना ६ आणि राष्ट्रवादी १ अशा जागांवर आघाडी घेण्याची शक्यता आहे. विशेषतः नशिराबाद नगरपरिषदेचा निकाल न्यायालयीन प्रक्रियेनंतर आज जाहीर होत असल्याने त्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. या जिल्ह्यात एकूण ५ लाख ७८ हजार मतदारांनी आपला कौल दिला असून, आज सायंकाळपर्यंत सर्व १८ नगरपालिकांचे अधिकृत निकाल स्पष्ट होणार आहेत.