Eknath Khadse : मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या घरातील चोरी प्रकरणात मोठा ट्विस्ट; त्या माहितीने पोलीसही हादरले, अपडेट काय?

Eknath Khadse House Theft case : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगाव शहरातील घरात जबरी चोरी झाली. त्यात सात ते आठ तोळे सोने, 35 हजार रुपये रोख चोरीला गेल्याचे समोर आले. पण आता या चोरी प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.

Eknath Khadse : मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या घरातील चोरी प्रकरणात मोठा ट्विस्ट; त्या माहितीने पोलीसही हादरले, अपडेट काय?
एकनाथ खडसे
| Updated on: Oct 29, 2025 | 1:59 PM

Eknath Khadse Big Allegation on Theft Case : राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या जळगाव शहरातील शिवराम नगरमधील घरी जबरी चोरी झाली. त्यात सात ते आठ तोळे सोने, 35 हजार रुपये रोख चोरीला गेल्याचे समोर आले. परवा मध्यरात्री ही चोरी घटना घडली. याविषयीचे एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. एका तासात चोरट्यांनी हातसफाई केल्याचे समोर आले. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत. तर आज एकनाथ खडसे हे जळगावमध्ये दाखल झाले. त्यांनी घरात काय काय चोरीला गेले याचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी मोठा आरोप केला. भुरट्या चोरांचे हे काम नसल्याचे सूतोवाच त्यांनी केले. त्यामुळे राजकीय विरोधकांकडे त्यांचे बोट जात असल्याचे समोर येत आहे.

सीडी, पेन ड्राईव्ह, महत्त्वाची कागदपत्रं का चोरली?

आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावात शिवराम नगर येथील निवासस्थानी चोरी झाल्याची घटना घडली आहे, या चोरीच्या घटनेबाबत आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत. चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्द पद्धतीने रेकी करून माझ्या घरातली भ्रष्टाचारा संदर्भातली महत्त्वाची कागदपत्र तसेच महत्त्वाच्या सीडी, पेन ड्राईव्ह चोरून नेण्यासाठीच झाल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे.

पुरावेच नेले चोरून

चोरट्यांनी दहा सीडीज चोरूल्या असून उर्वरित सात सीडीज शिल्लक आहेत तर घरातले सर्व 25 ते 30 पेन ड्राईव्ह देखील चोरून नेल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. ज्या शिल्लक राहिलेल्या सीडीज आणि कागदपत्र आहेत ते मी पोलिसांना देखील दाखवणार असून त्या दृष्टीने तपास करण्यात बाबत पोलिसांना विनंती करणार असल्याचा एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

ज्या पद्धतीने ही चोरी झाली ती कुणाच्या सांगण्यावरून ही चोरी झाली का? आत्ताच मी कुणाचं नाव घेऊ शकत नाही, आक्षेप सुद्धा मी घेणार नाही, असे देखील खडसे यांनी म्हटले आहे. चोरट्यांचा केवळ चोरी करणे हा उद्देश नव्हता तर माझ्या घरातली कागदपत्र पेन ड्राईव्ह सीडी सोडून नेण्याचाच उद्देशाने ही चोरी झाल्याचा दावा खडसेंनी केला आहे.जळगावातील निवासस्थानी चोरी झाल्यानंतर आज आमदार एकनाथ खडसे यांनी पाहणी करत घटनेची माहिती घेतली त्यानंतर पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

काल पोलिस उपअधीक्षक नितीन गणापुरे यांनी माहिती दिली आहे. त्यानुसार, चोरट्यांनी 868 ग्रॅम एवढं सोनं आणि 35 हजार रुपये एवढा मुद्देमाल चोरला. सध्या घटनास्थळी श्वानपथक तसेच ठसे तज्ञांच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे तसेच पोलीस ठाण्याची ही स्वतंत्र पथक चोरट्यांच्या शोधार्थ रवाना केल्याची माहिती त्यांनी दिली.