आजी-माजी पती पत्नी आमदार थोडक्यात बचावले; वाळूच्या डंपर आणि कारचा भीषण अपघात…

| Updated on: May 27, 2023 | 11:45 PM

कारमध्ये आमदार कारमध्ये आमदार सोनवणे यांच्यासोबत पती चंद्रकांत सोनवणे बॉडीगार्ड आणि चालकही होता. या अपघातामुळे मात्र आता जळगाव जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

आजी-माजी पती पत्नी आमदार थोडक्यात बचावले; वाळूच्या डंपर आणि कारचा भीषण अपघात...
Follow us on

जळगाव : वाळूच्या भरधाव डंपरने आमदार सोनवणे यांच्या कारला धडक दिल्याने अपघात झाला, मात्र या भीषण अपघातात दोघंही पती पत्नी थोडक्यात बचावले आहेत. हा अपघात झाल्यानंतर रस्त्यावर प्रचंड वाहनांची गर्दी झाली होती. आजी-माजी पती-पत्नी आमदारांच्या कारचा अपघात झाल्याचे कळताच नागरिकांचही मोठी गर्दी जमली होती. शिवसेना शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांच्या कारला वाळूच्या डंपरने धडक दिल्याने त्यांच्या कारचेही प्रचंड नुकसाना झाले आहे. अपघातानंतर मात्र डंपर चालकाने पळ काढला.

आमदार लता सोनवणे यांच्या कारचा अपघात जळगाव तालुक्यातील करंज गावाजवळ रात्रीच्या सुमारास झाला. वाळूच्या डंपरने आमदारांच्या डंपरला धडक दिल्याने आता अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

डंपरने कारला धडक देताच कारमध्ये असलेल्या आजी माजी आमदार दापत्यांना मुका मारला लागला आहे. चंद्रकांत सोनवणे यांच्या चेहऱ्याला तर लता सोनवणे यांच्या मानेला थोडा मार लागला.

आपल्या कामासाठी त्यांनी आपल्या भागात दौरा काढला होता. यावेळी भरधाव आलेल्या डंपरने त्यांच्या कारला उडवले. या अपघातात त्यांच्या कारचे प्रचंड नुकसान झाले आहे.

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने लोकप्रतिनिधीच्याच कारला उडवून दिल्याने आता अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आहे. या अपघातात आमदार लता सोनवणे बालंबाल बचावल्या आहेत.

कारचे प्रचंड नुकसान झाल्याने नागरिकांनीही लगेच घटनास्थळी धाव घेतली. लोकांचा जमाव जमताच डंपरने चालकाने अपघातस्थळावरून पळ काढला.

तर कारमध्ये आमदार कारमध्ये आमदार सोनवणे यांच्यासोबत पती चंद्रकांत सोनवणे बॉडीगार्ड आणि चालकही होता. या अपघातामुळे मात्र आता जळगाव जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.