Russia Ukraine War : चाळीसगावचा प्रसन्न निकम युक्रेनमध्ये अडकला, कुटुंबीयांची दुतावासाकडे मदतीची मागणी

| Updated on: Feb 27, 2022 | 2:55 PM

रशियाने युक्रेनवर हल्ले सुरू केले आहेत. युद्धाचा भडका उडाला आहे. उच्चशिक्षणासाठी गेलेले अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यात चाळीसगाव येथील प्रसन्न संजीव निकम हा देखील अडकला आहे. प्रसन्न निकम हा ग्रामसेवक संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष संजीव निकम यांचा मुलगा आहे.

Russia Ukraine War : चाळीसगावचा प्रसन्न निकम युक्रेनमध्ये अडकला, कुटुंबीयांची दुतावासाकडे मदतीची मागणी
प्रसन्न निकम
Follow us on

चाळीसगाव : रशियाने (Russia) युक्रेनवर (Ukraine) हल्ले सुरू केले आहेत. युद्धाचा भडका उडाला आहे. उच्चशिक्षणासाठी गेलेले अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यात चाळीसगाव येथील प्रसन्न संजीव निकम (Prasanna Sanjeev Nikam) हा देखील अडकला आहे. प्रसन्न निकम हा ग्रामसेवक संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष संजीव निकम यांचा मुलगा आहे. प्रसन्न एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी युक्रेनला गेला आहे. ते सध्या एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला आहे. मात्र  अचानक युद्ध सुरू झाल्याने युनिव्हर्सिटीमधील सर्व विद्यार्थी हवालदिल झाली आहेत. मॅनेजमेंटकडून युद्ध होणार नाही असं सागितलं जात होतं. त्यामुळे विद्यार्थी मायदेशी परतली नाहीत. मात्र अचानक युद्धाला सुरुवात झाल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. सर्वांना दिवसभर बंकरमध्ये  राहावं लागत आहे. तसेच खाद्यपदार्थ प्रचंड महागल्याने खाण्याचे देखील हाल होत आहेत. चार महिन्यांपूर्वी प्रसन्न 12 सप्टेंबरला युक्रेनला गेला आहे. छान शिक्षण सुरू होतं. युद्ध सुरू होईल अशा बातम्या येत होत्या, 26 तारखेचं तिकीट त्याने भारतात येण्यासाठी बुक केलं होत. म्हणजे आज प्रसन्न मायदेशी परतणार होता, पण युद्ध सुरू झाल्याने विमान प्रवास बंद झाला आणि प्रसन्न युक्रेनमध्ये अडकला अशी माहिती प्रसन्नचे वडील संजीव पाटील यांनी दिली  आहे.

कुटुंबाची चिंता वाढली

युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, हल्ले आणि बॉम्बस्फोटाच्या बातम्यासमोर येत आहेत. प्रसन्न युक्रेनमध्ये अडकल्याने त्याच्या कुटुंबाची चिंता वाढली आहे. मात्र दररोज तो आपल्या कुटुंबाशी संवाद साधत असल्याची माहिती त्याच्या वडिलांनी दिली आहे. , युक्रेनमध्ये अडकलेल्या प्रसन्न आणि इतरांना यायचं तर आता रोमानिया मार्गे यावं लागेल.  युनिव्हर्सिटीपासून हे अंतर 900 किमी आहे. प्रसन्न लवकरात लवकर घरी परतावा यासाठी त्याची बहिण सातत्याने भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहे. आता प्रसन्न कधी घरी येणार याकडे त्याच्या कुटुंबींयांचे डोळे लागले आहेत.

1200 भारतीय विद्यार्थी अडकले

आम्ही युक्रेनमध्ये सुखरूप आहोत सायरन वाजलं की बंकरमध्ये राहावं लागतं, होस्टेलला मिळते ते खावं लागतं. सर्वच महागलंआहे, काही मुले तर प्रचंड घाबरली आहेत. आम्ही एकूण 1200 भरतीय या ठिकाणी आहोत. पुढील शिक्षणाचे काय होईल ही चिंता आहेच शिवाय हे सर्व आम्ही कधी पाहीले नाही, त्याने भीती पण वाटते. भारतीय दुतावासाकडून आम्हाला कधी बोलावणे येते आणि आम्ही आमच्या घरी कधी जातो याची आम्ही वाटत पहात असल्यचे प्रसन्न याने म्हटले आहे.

संबंधित बातम्या

धक्कादायक! जेपी नड्डांचं ट्विटर अकाउंट हॅक, युक्रेनला मदतीचे आवाहन

#MannKiBaat : टांझानियन भाऊ-बहीण kili paul, nima paulचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक, म्हणाले…

Russia Ukraine War : हंगेरीच्या बुडापेस्टमधून तिसरे विमान भारताकडे रवाना