Jalgaon | गिरणा धरणातून 11880 क्यूसेक पाण्याच्या विसर्ग सुरू, धरणाचे सहा दरवाजे उघडले…

| Updated on: Aug 17, 2022 | 8:33 AM

धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने गिराणा धरणातून तब्बल 11880 क्यूसेक पाण्याची विसर्ग सुरू करण्यात आलायं. यामुळे नदीच्या पाण्यामध्ये मोठी वाढ होतायं. इतकेच नाही तर गिरणा पाटबंधारे विभागाने धरणातून विसर्ग अधिक वाढण्याची शक्यता देखील वर्तवलीयं.

Jalgaon | गिरणा धरणातून 11880 क्यूसेक पाण्याच्या विसर्ग सुरू, धरणाचे सहा दरवाजे उघडले...
Follow us on

जळगाव : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने (Rain) हजेरी लावल्याने जवळपास सर्वच धरणे ओव्हर फ्लो झालीयं. गिरणा धरणातून (Girana Dam) देखील पाण्याच्या विसर्ग सुरू करण्यात आलायं. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस होत असल्याने विसर्ग सुरू करण्यात आलायं. चार दरवाजाचे दोन फुटाणे तर, दोन दरवाजे एक फुटाणे उघडण्यात आल्याने पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरूयं. गिरणा पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देत नदीपात्रात उतरण्यास मनाई केलीयं. पाण्याच्या (Water) विसर्गामुळे नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे.

धरण पाणलोट क्षेत्रात चांगला होत असल्याने पाण्याचा विसर्ग सुरू

धरण पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत असल्याने गिरणा धरणातून तब्बल 11880 क्यूसेक पाण्याची विसर्ग सुरू करण्यात आलायं. यामुळे नदीच्या पाण्यामध्ये मोठी वाढ होतायं. इतकेच नाही तर गिरणा पाटबंधारे विभागाने धरणातून विसर्ग अधिक वाढण्याची शक्यता देखील वर्तवलीयं. कारण धरण पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाऊस सुरू असल्याने 11880 क्यूसेकपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू केला जाऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

गिरणा पाटबंधारे विभागाने नागरिकांना दिला सतर्कतेचा इशारा

धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक बघता विसर्ग कमी जास्त प्रमाणात करण्यात येणार असल्याची गिरणा पाटबंधारे विभागाने दिलीयं. गिरणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलायं. पुढील काही तास अजून नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते असेही सांगण्यात आले. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण खानदेशची भागीरथी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरणा धरणातून गेल्या महिन्याभरापासून पाण्याचा विसर्ग कमी जास्त प्रमाणात सुरू आहे.