Jalgaon DCC Bank Election 2026: जिल्हा बँकेचे राजकारण तापलं! गुलाबराव पाटलांनी भाजप आमदाराला खडसावलं, महायुतीत जोरदार जुंपली

जिल्हा बँक निवडणुकीत शिंदेगटाचा उमेदवार विरोधात असल्याने भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटील यांच्यावर जोरदार टिका केली होती. या आरोप- प्रत्यारोपावरुन आता शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंगेश चव्हाण यांची कानउघडणी केली आहे. 

Jalgaon DCC Bank Election 2026: जिल्हा बँकेचे राजकारण तापलं! गुलाबराव पाटलांनी भाजप आमदाराला खडसावलं, महायुतीत जोरदार जुंपली
| Updated on: Nov 19, 2026 | 8:21 PM

किशोर पाटील, प्रतिनिधी:  जळगावमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरुन राजकारण चांगलेच तापले आहे. जिल्हा बँक निवडणुकीत शिंदेगटाचा उमेदवार विरोधात असल्याने भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी आमदार किशोर पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटील यांच्यावर जोरदार टिका केली होती. या आरोप- प्रत्यारोपावरुन आता शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंगेश चव्हाण यांची कानउघडणी केली आहे.

काय म्हणालेत गुलाबराव पाटील? 

“मंगेश चव्हाण यांनी काही खंत या ठिकाणी व्यक्त केली असून मात्र ते नवीन आमदार आहेत संघर्षाच्या बाबतीत त्यांनी खूप गोष्टी सांगितल्या. तुमच्या वयात असताना आम्ही तुमच्यापेक्षा जास्त गरम होतो तुमच्या संघर्षाची आता सुरुवात झाली आहे, त्यामुळे जसं जसं माणसाचं वय वाढत जातं तसं तसं माणूस कमी दुश्मनी करण्याचा प्रयत्न करतो,” असं मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

Loading...

“एका व्यक्तीमुळे महायुतीमध्ये अलबेल होऊ शकत नाही, मात्र तुम्ही जसं वचन दिल आहे तस आम्ही तुम्हाला वचन देत आहोत, महायुती तुमच्यासोबत आहे. हल्लीच्या जगामध्ये तोंड जरा बंद पाहिजेल. लोक तुम्हाला कितीही डिवचण्याचा प्रयत्न करतील, मात्र तुम्ही चिडचिड करता असे दिसत आहे. जे करतील ते भरतील. तुम्ही एका व्यक्तीमुळे आमच्यावर राग नका करू हे फार चुकीचं आहे, आम्ही तुम्हाला आय लव यू केलेले लोक आहोत, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंगेश चव्हाण यांना कानपिचक्या दिल्या.

दरम्यान,”तुम्ही महानगरपालिकेची निवडणूक बघितली. अतिशय समजदारपणे तुम्ही वागलात, मात्र आता का चिडचिड करत आहेत? कोण तुमच्या गाडीमध्ये होतं हे मला शोधावं लागेल. तुम्ही कपबशी (महायुतीचे चिन्ह) मध्ये चहा द्या, सर्व कपबश्या निवडून आल्या म्हणजे समजा, दूध कुणाचे, साखर कुणाचे वापरा फक्त चहा द्या, असे म्हणत क्षमा करणे हे विराचे भूषण आहे ते प्रकट करायचे नसते ते आपोआप प्रकट होते,” असा सल्लाही मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाषणातून आमदार मंगेश चव्हाण यांना मंत्री दिला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us