पारोळा धुळे मार्गावर अज्ञातांकडून दोन बसवर दगडफेक, मोठी दुर्घटना टळली

| Updated on: Jan 22, 2022 | 7:26 PM

जळगाव धुळे व धुळे जळगाव या दोन एसटी बसवर पारोळा ते धुळेदरम्यान दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात आरोपींकडून दगडफेक करण्यात आली आहे. या घटनेत बसच्या समोरील काच फुटली असून, धुळ्याकडे जाणाऱ्या बसच्या चालकाला दुखापत झाली आहे.

पारोळा धुळे मार्गावर अज्ञातांकडून दोन बसवर दगडफेक, मोठी दुर्घटना टळली
Follow us on

जळगाव : दुचाकीवर आलेल्या अज्ञात व्यक्तींकडून दोन एसटी बसवर  दगडफेक (stone throwing on bus)  करण्यात आल्याची घटना जिल्ह्यातून समोर आली आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST workers strike) सुरूच आहे. कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे एसटी सेवा ठप्प असल्याने प्रवाशांचे हाल सुरू आहेत. तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. जे कर्मचारी कामावर हजर होणार नाहीत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील करण्यात येत आहे. कारवाईच्या भितीने काही कर्मचारी कामावर रूजू झाले आहेत. याच कर्मचाऱ्यांच्या बळावर काही ठिकाणी एसटी बस सेवा (bus) सुरू झाली आहे. मात्र आता बसवर दगडफेकीच्या घटना घडत आहेत. यापूर्वी देखील अशा अनेक घटना समोर आल्या आहेत.

आरोपींविरोधात गुन्हा दाखल

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव धुळे व धुळे जळगाव या दोन एसटी बसवर पारोळा ते धुळेदरम्यान दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात आरोपींकडून दगडफेक करण्यात आली आहे. या घटनेत बसच्या समोरील काच फुटली असून, धुळ्याकडे जाणाऱ्या बसच्या चालकाला दुखापत झाली आहे. तर जळगावकडे जाणाऱ्या बसच्या चालकाने वेळीच गाडीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला. या प्रकरणात दगडफेक करणाऱ्या दोनही अज्ञात आरोपींविरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

काय आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या?

एसटीचे राज्य सरकारमध्ये विलिनिकरण करून, कर्मचाऱ्यांना क वर्गाचा दर्जा देण्यात यावा या प्रमुख मागणीसह वेतनामध्ये वाढ, घरभाडे वाढ अशा विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दरम्यान शासनाने पगार वाढ केल्यानंतर अनेक एसटी कर्मचारी पुन्हा एकदा कामावर रुजू झाले आहेत. मात्र अद्यापही काही कर्मचारी हे विलिनिकरणाच्या मुद्द्यावर अडून बसल्याचे दिसत आहे. जोपर्यंत विलिनिकरण होणार नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

संबंधित बातम्या

ekha Punekar | लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने दिली मोठी जबाबदारी !

मेडिकल स्टोअर्सवाल्यांना नोटा मोजण्यासाठी वेळ कसा मिळतो?; अजितदादांनी फटकारले

VIDEO: शेलार म्हणाले, गोव्यात शिवसेनेचं डिपॉझिट जरी वाचले तरी… ; राऊतांनी ऐकवला मराठा साम्राज्याच मूलमंत्र!