
राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. राज्यात महायुतीच्या 215 जागा, मविआ 49 तर स्थानिक आघाडी 24 जागा निवडून आल्या आहेत. जळगावत जिल्ह्यातील यावल, पाचोरा, फैजपूर, सावदा, भुसावळ, चोपडा, अंमळनेर, चाळीसगाव, धरणगाव, पारोळा अशा 12 महत्त्वाच्या नगरपरिषदांचा निकाल जाहिर झाला आहे. त्यामधील यावल येथील निकालाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. कारण येथे शिवसेना ठाकरे ठाकरे गटाने आपलं खातं खोललं आहे. दरम्यान, या जिल्ह्यात भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांचे मोठे वर्चस्व आहे. असे असताना यावलमध्ये ठाकरे गटाने केलेली सरशी म्हणजे महाजन यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
जळगाव जिल्ह्यात यावल नगर परिषदेवर शिवसेना ठाकरे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार छाया पाटील विजयी ठरल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाने नगराध्यक्ष पदासाठी आपलं खातं उघडलं आहे. छाया पाटील यांनी भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार रोहिणी फेगडे यांचा पराभव केला आहे. यावल तालुक्यात शिवसेना ठाकरे गटाकडून भाजपाला मोठा धक्का बसला आहे.
2017ला कोण विजयी झाले होते?
यावल नगरपरिषद निवडणूक 2017मध्ये शिवसेनेच्या सुरेखा कोळी या विजयची ठरल्या होत्या. 2017 साली यावल नगरपरिषदेत एकूण 20 प्रभाग होते. यापैकी काँग्रेसने 8 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रवादीने 0 जागा, भाजपने 0 जागा जिंकल्या होत्या. तर शिवसेनेने 1 जागा आणि इतर उमेदवारांनी 11 जागा जिंकल्या होत्या.
जळगावमधील चोपडा येथील निकाल काय?
चोपडा नगरपरिषद येथे शिवसेना शिंदे गट व काँग्रेस या अभद्र युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेना शिंदे गट व काँग्रेस युतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नम्रता पाटील यांचा विजयी झाला आहे. नम्रता पाटील यांनी भाजपच्या उमेदवार साधना चौधरी यांचा पराभव केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांनी गड राखला आहे. येथून एकूण 31 जागांसाठी निवडणूक झाली. तेथून शिवसेना शिंदे गटाचे 16 नगरसेवक, भाजपचे 6 नगरसेवक, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2 नगरसेवक, काँग्रेस चे 4 नगरसेवक, अपक्ष 2 नगरसेवक निवडून आले आहेत.