शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीला अपघात, पोलीस व्हॅनने दिली कारला धडक

या पोलीस व्हॅनने आमदार चिमणराव पाटील यांच्या कारला मागून धडक दिली. या अपघातात चिमणराव पाटील यांना किरकोळ दुखापत झाली.

शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीला अपघात, पोलीस व्हॅनने दिली कारला धडक
| Edited By: | Updated on: Aug 06, 2023 | 8:50 PM

जळगाव : जळगाव जिल्ह्यात शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात आमदार किरकोळ जखमी झाले. आमदारांच्या कारचे नुकसान झाले आहे. पारोळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या गाडीला अपघात झाला. अमळनेर शहराजवळ असलेल्या अंबर्षी महाराज टेकडीजवळ हा अपघात झाला. आमदार चिमणराव पाटील यांच्या ताफ्यात पोलीस सुरक्षा रक्षकांची व्हॅन होती. या पोलीस व्हॅनने आमदार चिमणराव पाटील यांच्या कारला मागून धडक दिली. या अपघातात चिमणराव पाटील यांना किरकोळ दुखापत झाली. मात्र पोलीस व्हॅन आणि चिमणराव पाटील यांच्या कारचे नुकसान झाले आहे.


असा झाला अपघात

पारोळा विधानसभा क्षेत्राचे आमदार चिमणराव पाटील यांची कार समोर होती. त्यांच्या सुरक्षा ताफ्यात पोलीस व्हॅन होती. ही पोलीस व्हॅन मागे होती. पोलीस व्हॅनने मागून आमदार चिमणराव पाटील यांच्या कारला धडक दिली. या धडकेत दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. चिमणराव पाटील हे किरकोळ जखमी झाले.


दोन्ही गाड्यांचे नुकसान

मागे पोलीस व्हॅन होती. समोर आमदार चिमणराव पाटील यांची कार होती. पोलीस व्हॅनने कारला धडक दिली. यात दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. शिवाय आमदार चिमणराव पाटील हेसुद्धा जखमी झाले आहेत.

आमदार चिमणराव पाटील किरकोळ जखमी

आमदार चिमणराव पाटील यांच्या कारच्या मागच्या भागाला मार लागला आहे. शिवाय पोलीस व्हॅनच्या समोरील भाग डॅमेज झाला आहे. दोन्ही गाड्या एकमेकांना भिडल्या. परंतु, योग्यवेळी नियंत्रित झाल्याने थोडक्यात अपघात झाला. आमदार चिमणराव पाटील हेसुद्धा जखमी झाले. पण, त्यांची प्रकृती व्यवस्थित आहे. त्यांना किरकोळ जखम झाली.